Mon, Aug 10, 2020 04:29होमपेज › Ahamadnagar › ... तर कोरोनाला बरोबर घेऊन जगायला शिका : मुश्रीफ 

... तर कोरोनाला बरोबर घेऊन जगायला शिका : मुश्रीफ 

Last Updated: Jul 09 2020 7:49PM
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा 

आता शासन कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन करणार नाही. त्यामुळे संगमनेरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा काहीच विषय येणार नाही. तुम्ही फक्त आता कोरोनाला बरोबर घेऊन जगायला शिका, असा सल्ला पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संगमनेरच्या जनतेला दिला.  

अधिक वाचा : युजीसीबरोबर चर्चा करूनच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय: उदय सामंत

संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 164 वर जाऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई वरून थेट संगमनेरला आले होते. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी  पालकमंत्री  बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी जिल्हा पोलिस प्रमुख अखीलेश कुमार सिंह अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे संगमनेरचे  प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम जिल्हा पोलिस उपअधीक्ष रोशन पंडित मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ भास्कर भवर, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद बांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.    

अधिक वाचा : सारथी संस्थेला ८ कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, शासनाने लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतर तसेच जिल्ह्याच्या सीमा बंदी उठविल्यानंतर  मुंबई, पुणे  या रेडझोन असणाऱ्या शहरातील नागरिक संगमनेर तालुक्यात मोठ्या संख्येने आले. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली आहे. तसेच  कुरण या एका गावामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे असले तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे  कारण नाही. मात्र सर्दी, खोकला, ताप यासारखे लक्षणे दिसू लागल्यास नागरिकांनी अंगावर न काढता  तात्काळ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत, अशी लक्षणे  दिसणाऱ्या नागरिकांनी हे आजार अंगावर काढल्‍यास याचा जीवाला धोका उत्‍पन्न होउ शकतो असे ते म्‍हणाले. 

संगमनेर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्‍यूचे प्रमाण नऊ टक्क्यांवर जाऊन पोचले आहे. ते प्रमाण  कुठल्याही परिस्थितीत कमी करणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने रुग्ण आढळून आलेल्या भागातील  नागरिकांचे सर्व्हे वाढवून त्‍या भागातील  जास्‍ती - जास्‍त लोकांच्या टेस्‍ट वाढविण्याची गरज त्‍यांनी व्यक्‍त केली.

अधिक वाचा : भारतीय रेल्वेने तयार केले बॅटरीवर चालणारे इंजिन!

जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यात रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढणार आहे. असे संकेत अनेक तज्ञांनी दिलेली आहेत त्यामुळे कोरोनावर जो पर्यंत औषध येत नाही. तो पर्यंत सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. येथून पुढील काळात  मास्क आपले सर्वांचे एटी फोर्टी सेवन सेवन आहे. त्यामुळे  प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.  

पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारला

संगमनेर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी पालक मंत्री हसन मुश्रीफ संगमनेरात आले होते. त्या वेळी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीसाठी आलेल्या पत्रकारांना आढावा बैठकीला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे बैठकीमध्ये नेमके काय घडले याची माहिती पत्रकारां पर्यंत पोहोचू शकले नाही.