श्रीगोन्दे (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा
कोळगाव येथील एका व्यक्तिने बेकायदा दारुचा साठा करून ठेवलेल्या ठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अडीच लाखाहून अधिक रकमेची देशी- विदेशी दारु जप्त केली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.
कोळगाव येथे एकाचा बीअर शॉपी चालविण्याचा परवाना आहे. बियर शॉपी चालक बेकायदा देशी- विदेशी दारु विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. २२ रोजी) दुपारी या बियर शॉपीवर छापा टाकला. त्यावेळी या शॉपीमध्ये देशी-विदेशी दारु आढ़ळून आली. पोलिस पथकाने अधिक विचारपूस केली असता काही मुद्देमाल घरी ठेवल्याची माहिती त्याने दिली. पोलिस पथकाने घराची झडती घेतली असता घरातील मंडळीनी कारवाईस विरोध करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाने त्याना योग्य ती समज देत घरात लपवून ठेवलेला दारुचा साठा जप्त केला.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे मोजमाप सूरु आहे. अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संतोष रोडे, रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, रविंद्र घूंगाटे, प्रकाश वाघ, संदीप चव्हाण, विनोद मासाळकर, रोहित मिसाळ, रोहिदास नवघिरे, कमलेश पाथ्रुड, सागर सुलाने, सचिन कोळेकर, महिला पोलिस कर्मचारी सोनाली साठे यांच्या पथकाने केली.