Sun, Aug 09, 2020 10:55होमपेज › Ahamadnagar › सरकारी कार्यालयात प्लॅस्टिक पिशव्या!

सरकारी कार्यालयात प्लॅस्टिक पिशव्या!

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 11:27PMसावेडी : प्रतिनिधी

राज्य सरकारने प्‍लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची शहरासह उपनगरात महापालिकेने प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात केली असली, तरी प्रशासकीय  कार्यालयांतच  या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात आहे. हे चित्र  सावेडी उपनगरातील तहसील कार्यालयात सर्रासपणे पाहण्यास मिळत आहे.

राज्य सरकारने 23 जून रोजी प्‍लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाची शहरात अंमलबजावणी होऊन अनेक व्यवसायिकांना दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यामध्ये प्‍लॅस्टिक पासून बनविल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या पिशव्यांचा समावेश आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक प्रशासकिय कार्यालयातच अधिकार्‍यांसमोर प्‍लॅस्टिक पिशव्या वापरत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच  व्यवसायिकांनी राज्य सरकारकडे या निर्णयाला विरोध केल्याने जो पर्यंत दुकानात प्‍लॅस्टिक पिशवीतील पॅकिंग आहे. तोपर्यंत व्यवसासिकांना दंड करु नये असा राज्य सरकारने निर्णय घेतला.  मात्र या निर्णयामुळे महापालिकेचे आधिकारी यांची कारवाईची अंमलबजावणी करताना दोलायमान दिसत आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये गैरसमज होऊन आज सर्वसामान्य नागरिक प्रशासकिय कार्यालयातील अधिकार्‍यांसमोर प्‍लॅस्टिक पिशवी घेऊन फिरताना  दिसत आहे. त्यामुळे प्रशासकिय अधिकारीच या निर्णयाला केराची टोपली दाखवत आहेत.

रेव्हेन्यू सोसायटीच्या सर्वसाधारण सभा नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. सोसायटीचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना देण्यात येणार्‍या पुष्पगुच्छाला प्‍लॅस्टिकचे आवरण होते. त्यामुळे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी सोसायटीला पाच हजार रुपयांचा दंड केला. असे असताना इतर कार्यालयांतील अधिकारी मात्र प्‍लॅस्टिक बंदी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वसामांन्यामध्ये सर्रास प्‍लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरु आहे.