Wed, Jan 20, 2021 21:37
कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही : जयंत पाटील

Last Updated: Jan 13 2021 5:12PM
अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ओशिवरा पोलिस ठाण्यात करुणा शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. (Karuna Sharma has filed a rape case filed against Dhananjay Munde at Oshiwara police station) त्यानंतर राज्यात उलटसुलट चर्चेंना उत आला आहे. मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना हे आरोप खोडून काढले. त्यांनी 'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, असा खळबळजनक खुलासा केला.  

वाचा : धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ शकते का? कायदेशीर प्रक्रिया काय सांगते

दरम्यान, धनंजय मुंडे (social justice minister Dhananjay Munde) यांनी ताबडतोब राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे (Uma Khapre, President  Mahila Morcha Maharashtra Pradesh BJP) यांनी केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले होते. यासगळ्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 'कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेनी आपली भुमिका स्पष्ट केलीय.' असे म्हटले आहे. ते अहमदनगर येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद बोलत होते. 

वाचा : धनंजय मुंडे यांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा का लागू होत नाही?

मुंडे यांच्यावर आरोप करताना करुणा शर्मा नावाच्या महिलेने म्हटले आहे की, २००६ पासून बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली तिच्या इच्छेविरुद्ध मुंडे यांनी शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक संबंधाचे व्हिडीओ करू धमकावले. यानंतर लगेच मुंडे यांनी फेसबुकवर 'त्या' महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या संकटाचे मळभ दाटून आले असून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (social justice minister Dhananjay Munde) यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले आहेत. यावेळी अहमदनगर येथील एका कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणांवर आपली भूमिका मांडली त्यात त्यांनी 'राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावी लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी उच्चन्यायालयात यापुर्वीच अर्ज दाखल केला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. (Jayant Patil speek on Dhananjay Munde)

वाचा : नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीचे समन्स

तसेच यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या आरोपासंदर्भातील आरोपांवर बोलताना, या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. यात काही अर्थ नसल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे.