Fri, Apr 23, 2021 14:54
राहुरीत पत्रकाराचे अपहरण करुन हत्या 

Last Updated: Apr 07 2021 10:37AM

अहमदनगर: पुढारी ऑनलाईन

राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करुन हत्या करण्‍यात आली. पोलिसांनी या प्रकरणातील एक वाहन जप्त केले असून हत्या करणारे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप दातीर यांच्‍या पत्‍नीने केला आहे. 

वाचा : धक्कादायक : अंबाजोगाईत एकाच सरणावर आठ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार

दातीर यांचे मंगळवारी दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. ते  मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसवून नेले. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

वाचा : नांदेड : मुलीच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच पित्यावर नियतीचा घाला 

तीर यांची दुचाकी आणि चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांचा मोबाईल बंद होता त्यामुळे संपर्क साधता आला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधमोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेले वाहन ताब्यात घेतले. दरम्यान,  रात्री राहुरी कॉलेज रोड परिसरात दातीर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना अमानुष मारहाण करून हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे.