Sat, Sep 19, 2020 11:12होमपेज › Ahamadnagar › राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोनाबाधित

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोनाबाधित

Last Updated: Sep 07 2020 3:08PM
राहुरी (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा 

राहुरी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पहिल्यांदाच विधानसभा लढवत २५ वर्ष आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डीले यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी राज्य मंत्री पदावर विराजमान होत राज्यभर दौरे केले.

वाचा -MPSC कडून नवीन वेळापत्रक जाहीर 

राज्यातील शिक्षण, ऊर्जा, शहरातील विकास याबाबत त्यांनी विशेष लक्ष दिले होते. जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा त्यांनी नुकताच आढावा घेत कोरोना नियंत्रणासाठी उपाय योजना सुचविल्या होत्या. मतदार संघात विकासात्मक कामांचे नियोजन होत असतानाच त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी सोशल मीडियामध्ये आपण कोरोना संक्रमित झाल्याचे सांगितले आहे. 

वाचा- कोरोनाला ‘ब्लॉक’ करू शकणार्‍या ‘नॅनोबॉडी’चा शोध

सतत फिल्डवर आहे. लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतः ची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार

  - प्राजक्त तनपुरे 

 "