Mon, Jul 06, 2020 10:29होमपेज › Ahamadnagar › उड्डाण पुलासाठी संरक्षण मंत्र्यांशी बैठक

उड्डाण पुलासाठी संरक्षण मंत्र्यांशी बैठक

Last Updated: Dec 05 2019 1:32AM

नगर : येथील प्रस्तावित उड्डाणपुलासंदर्भात खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.नगर : प्रतिनिधी
शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्यासमवेत तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिली.

संसदेच्या अधिवेशना दरम्यान खासदार विखे यांनी शहरातील उड्डाणपूल आणि नगर-शिर्डी या महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. जिल्ह्यातील या दोन्ही महत्त्वपूर्ण कामांकडे त्यांचे लक्ष वेधले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख आशिष शर्मा यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. बैठकीत विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाचा मार्ग हा संरक्षण विभागाच्या जागेतून जात असल्याने, या जागेचे भूसंपादन होण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. याबाबत तातडीने निर्णय होण्याची गरज व्यक्त केली.

यासंदर्भात पुढील आठवड्यातच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. नगर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गाचे  चौपदरीकरण आहे त्या परिस्थितीत  प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याची मागणी विखे यांनी केली. त्याला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.