Sat, Jul 11, 2020 11:00होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंदेत मोर व काळवीटची हत्या; दोघे ताब्यात

श्रीगोंदेत मोर व काळवीटची हत्या; दोघे ताब्यात

Last Updated: Jul 02 2020 7:54AM
अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा 

श्रीगोंदे तालुक्यातील देऊळगाव येथे आज सकाळी काळवीट व राष्ट्रीय पक्षी मोराची हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात गावातील दोघाजणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान संबधित दोघांच्या घरातून मोराचे पाय आणि काळविटाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. 

अधिक वाचा : वाळूतस्करांची पिकअप उलटून तीन ठार

याबाबत अधिक माहिती अशी की, देऊळगाव शिवारात वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. त्याचबरोबर जंगल क्षेत्रही आहे. या जंगलात मोर, हरीण, काळवीट यांचे वास्तव्य आहे. आज (दि.२९ जून) सकाळी साडेआठच्या सुमारास वन अधिकारी विनय नातू यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देऊळगाव शिवारात मोर आणि काळविटाची हत्या करण्यात आली असून काही व्यक्ती त्याचे मांस शिजवत आहेत. माहिती नुसार वनविभागाच्या पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी जवळपास अडीच किलो मांस आढळून आले. काही अंतरावर काळवीटाचे कातडे आढळून आले. एका पेटित मोराचे पीस आणि पाय आढळून आले. वनविभागाच्या पथकाने हा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अधिक वाचा : पंतप्रधानांनी संभ्रम दूर करावा : थोरात

ज्या ठिकाणी मोराची व काळविटाची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी रक्त आढळून आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मोराच्या पायलाही रक्त आढळून आले आहे. वनविभागाने या कारवाईत दोघाजणांना ताब्यात घेतले आहे.