Wed, Aug 12, 2020 03:31होमपेज › Ahamadnagar › महावितरणात दीड तास ठिय्या

महावितरणात दीड तास ठिय्या

Published On: Dec 18 2017 2:27AM | Last Updated: Dec 18 2017 12:39AM

बुकमार्क करा

पारनेर ः प्रतिनिधी   

गेल्या दोन महिन्यांपासून नादुरूस्त असलेले पळशी येथील रोहित्र बदलून मिळावे, या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयात दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. महावितरणचे सहायक उपअभियंता मंगेश प्रजापती यांनी मंगळवारपर्यंत रोहित्र बदलून देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.   
जुन्या गावठाणातील रोहित्र गेल्या दोन महिन्यांपासून नादुरूस्त असल्याचे आंदोलकांनी प्रजापती यांना सांगितल्यानंतर तसा अहवाल अद्यापही आपणाकडे प्राप्त झाला नसल्याचे प्रजापती यांनी सांगितल्यानंंतर आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत रोहित्र बदलून दिले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत ग्रामस्थांनी घोषणाबाजी सुरू केली.

त्यानंतर प्रजापती यांनी टाकळी ढोकेश्‍वरचे कनिष्ठ अभियंता देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तासाभरात पारनेर कार्यालयात रोहित्र जळाले असल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अहवालास उशीर झाल्याप्रकरणी दोषी असलेल्यांची चौकशी करून त्यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. मंगळवारपर्यंत रोहित्र बदलून देण्याचे लेखी अश्‍वासन प्रजापती यांनी यावेळी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  तालुकाध्यक्ष नंदू साळवे, भाउसाहेब मोढवे, महादू साळवे, अमोल देठे, तुळशीराम मोढवे, संतोष मोढवे, अशोक बिलबिले, नारायण वाळूंज, भरत गागरे, चंदर साळवे, विशाल मोढवे, मोहन मोढवे आदी यावेळी उपस्थित होते.