Wed, Aug 12, 2020 09:08होमपेज › Ahamadnagar › कोरोना चाचणीसाठी २२०० रुपये दर निश्‍चित

कोरोना चाचणीसाठी २२०० रुपये दर निश्‍चित

Last Updated: Jul 08 2020 11:00PM

संग्रहित छायाचित्रनगर : पुढारी वृत्तसेवा

खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणार्‍या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2 हजार 200 रुपये दर आकारला जाणार आहे. घरी जाऊन स्वॅब घेतल्यास मात्र त्यासाठी 2 हजार 800 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. 

कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना यापूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र त्यांनी किती दर आकारावा याबाबत निर्देश नव्हते. राज्य सरकारने  हा दर निश्चित केला आहे. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांनी कोरोना चाचण्यांसाठी या दरानेच आकारणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी आकारणी केली जाऊ नये, या दृष्टीकोनातून हे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारच्या आरोग्य विभागाने  नुकतीच यासंदर्भात चार सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीने शासनाला अहवाला सादर केला असून,  त्यांच्या शिफारशीनुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांनी या दरनिश्चितीनुसार दर आकारावेत, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.