Fri, Aug 07, 2020 15:41होमपेज › Ahamadnagar › ऊसप्रश्‍नी स्वाभिमानी- काँग्रेस करणार आंदोलन

ऊसप्रश्‍नी स्वाभिमानी- काँग्रेस करणार आंदोलन

Published On: Jan 30 2018 11:15PM | Last Updated: Jan 30 2018 10:54PM जामखेड:  प्रतिनिधी

तालुक्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्ट्स या खाजगी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना किचकट अटी घालून केवळ चाळीस हजार मेट्रिक टन ऊस घेण्याबाबत करार केला. गाळपाअभावी शिल्लक ऊसाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने स्वाभिमानी संघटना व तालुका युवक काँग्रेस ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे आंदोनाच्या पवित्र्यात आहेत. 

तालुक्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला. तसेच जलसंधारण कामांमुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी उसाकडे वळाला. साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ऊस कोणताही कारखाना घेईल, या भ्रमात ऊस उत्पादक शेतकरी होता. आदिनाथ (करमाळा), जय श्रीराम शुगर (हळगाव), भैरवनाथ शुगर (परांडा) या कारखान्यांच्या टोळ्या ठराविक भागातील ऊस घेत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जत, श्रीगोंदा व हळगाव येथील कारखान्यांकडे जाऊन ऊस घेण्याची विनवणी करीत आहेत. पण ते ऊस घ्यायला तयार नाहीत.

त्यामुळे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बोलभट, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू गंभिरे यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर श्रीराम शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्ट्स या कारखान्याचे जनरल मॅनेजर विठ्ठलराव गाढवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तालुक्यातील ऊस घेण्याची विनंती करून उसाला प्रतिटन 2 हजार 550 रुपये भाव द्यावा, ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून पाच वर्षे ऊस घालण्याबाबत स्टॅम्पवर लिहून घेण्याची पद्धत बंद करावी, हंगाम सुरू होणेपूर्वी ऊसदर जाहीर करावा, अशी मागणी केली. ऊस न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा बोलभट व गंभिरे यांनी दिला.