Sun, Sep 20, 2020 07:27होमपेज › Ahamadnagar › इंदोरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा

इंदोरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा

Last Updated: Aug 11 2020 1:31AM

निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज)संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने कनिष्ठ कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली आहे. 

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी किर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या फिर्यादीवर संगमनेर न्यायालयात आज सुनावणी झाली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी दि. २० ऑगस्ट रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होईल, अशी माहिती इंदोरीकर महाराज यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली. 

 "