Wed, Aug 12, 2020 09:36होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांचा दौरा; खड्डे बुजविण्याची घाई

मुख्यमंत्र्यांचा दौरा; खड्डे बुजविण्याची घाई

Published On: Aug 24 2019 1:26AM | Last Updated: Aug 24 2019 1:26AM
मढी : वार्ताहर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या सोमवारी सकाळी पाथर्डीत येत असून त्यानिमित्त राष्ट्रीय महामार्गाचे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू  आहे. गेल्या पाच वर्षात शंभराहून अधिक बळी घेणार्‍या महामार्गावरील नगर- पाथर्डी रस्त्यावरील खड्डे कुणीही मागणी न करता बुजवले जात आहेत. यापूर्वी याच मागणीसाठी सुमारे पंचवीस आंदोलने होऊनही उपयोग झाला नव्हता.

पाथर्डी -नगर  माहामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्याची मागणी  वेळोवेळी करूनसुद्धा हे खड्डे काही बुजले गेले नाहीत.सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे इशारे देऊनही सुस्तावलेला प्रशासनाने दखल मात्र कधी घेतली नाही   राष्ट्रीय महामार्ग केवळ नावापुरता ऊरून खड्डा मार्ग म्हणून ओळखला जातो . पुलाची अर्धवट कामे रस्त्याच्या जोडावर डांबर व्यवस्थित न टाकल्याने आदळणार्‍या गाड्या ,पूर्वीचे काम झालेल्या डांबरीकरणाचे  उघडे पडलेले भ्रष्टाचाराचे पितळ, ठेकेदार व अधिकार्‍यांचे दुर्लक्ष यामुळे अनेकांचे जीव गेले .तर अनेकांना अपघातामुळे अपंगतत्व आले. प्रशासन लोकप्रतिनिधी पत्रकार पदाधिकारी सर्वांनी  हात टेकले .बंद पडलेले काम सुरू होत नव्हते. योगायोगाने चार दिवसापूर्वी खासदार डॉ.सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांनी अधिकार्‍यांची संयुक्त बैठक पाथर्डीत घेऊन पुढील दहा दिवसात प्रलंबित प्रश्न व अडचणी बाबत वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आदेश स्थानिक प्रशासनाला दिला.

कामात अडथळे आणणार्‍यावर गुन्हे दाखल करण्यासह कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय बैठकीत झाला.