Wed, Jun 03, 2020 22:38होमपेज › Ahamadnagar › कुकडीचे पाणी आणण्यासाठी 'त्यांचे' हात धरले होते का? : पंकजा मुंडेंची विचारणा  

कुकडीचे पाणी आणण्यासाठी 'त्यांचे' हात धरले होते का? : पंकजा मुंडेंची विचारणा  

Last Updated: Oct 17 2019 8:28PM
जामखेड (अहमदनगर) : प्रतिनिधी

कर्जत जामखेडला विरोधक कुकडीचे पाणी आणणार अशी घोषणा करत आहेत. मग आघाडी सरकारची ७० वर्षे सत्ता होती, तसेच पवार घराण्यातले अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. मग पाणी का आणले नाही ? त्यांचे हात कोणी धरले होते का ? असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला. जामखेड येथे मंत्री राम शिंदे यांच्या प्रचाराची जाहीर सभा बाजारतळ येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळेस त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्यावेळी आघाडीची सत्ता होती त्यावेळेस पाणी आणू शकले नाही आणि आता कुठून पाणी आणणार आहेत. नुसते आश्वासनाचा पाऊस पाडत आहेत. गोर गरीब जनतेला फसवण्याचे काम या आघाडी सरकारने केले आहे. देशात मोदींचे सरकार आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार आहे. मग आपण का इकडे तिकडे पळायचे म्हणून मतदारांनी राम शिंदे यांना पुन्हा आमदार करा असे आवाहन मुंडे यांनी केले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता कर्जत जामखेड मतदारसंघात चांगले दिवस आले आहेत. सालकरी गरीबाच्या मुलाने मोठे व्हायचे नाही का ? असा विरोधकांना सवाल केला. 

धनंजय मुंडे हे जिथे सभा घेतात तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पडल्याशिवाय राहत नाहीत. येत्या २४ तारखेला महाराष्ट्रात घड्याळ बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तसेच युती सरकारने मराठा आरक्षण देण्याची महत्वाची भूमिका बजावली असून मराठा आरक्षण हे कायद्याने वैद्यच राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका आणि बारामतीचे पार्सल माघारी पाठवा असे, आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.