Mon, Aug 10, 2020 04:44होमपेज › Ahamadnagar › पारनेर नाट्यानंतर महाविकास आघाडीने घेतला धडा!

पारनेर नाट्यानंतर महाविकास आघाडीने घेतला धडा!

Last Updated: Jul 09 2020 8:05PM
नगर : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन प्रमुख नेत्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पक्षातील पदाधिकारी फोडल्यास ही समिती त्याबाबत निर्णय घेणार आहे. राज्यात पारनेर प्रकरणानंतर ही समिती स्थापन करण्यात आली आहे. भविष्यात या तिन्ही पक्षांतील पदाधिकारी फोडले जाणार नाहीत, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

 आणखी वाचा : युजीसीबरोबर चर्चा करूनच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय: उदय सामंत

पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून विधानसभा निवडणूक जिंकली. शिवसेनेचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्याकडे पारनेर नगर पंचायतीची सत्ता आहे. नगरपंचायतीमधील काही नगरसेवकांमध्ये धुसफूस होती. त्या नगरसेवकांनी आमदार लंकेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार स्थापन करताना काही समान कार्यक्रम ठरलेला आहे. मात्र, अशा स्वरूपाच्या राजकीय पेच प्रसंगाबाबत कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत काहीही ठरलेले नव्हते. पारनेर प्रकरणानंतर अशी परिस्थिती हाताळण्यासाठी दोन्ही पक्षांच्या दोन प्रमुख नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 

 आणखी वाचा : ... तर कोरोनाला बरोबर घेऊन जगायला शिका : मुश्रीफ 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, तर शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांचा समावेश राहणार आहे. या समितीकडे अशा स्वरुपाची प्रकरणे सोपविली जातील. या तिन्ही पक्षातील पदाधिकार्‍यांची फोडाफोडी होणार नाही. तिन्ही पक्ष कोणत्या स्वरुपात विस्तारतील, याकडे लक्ष दिले जाईल. या उलट कोणी भाजपकडे जाणार नाही, याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 आणखी वाचा : 'सारथी'साठी तातडीने आजच्या आज ८ कोटींचा निधी उपलब्ध; अजित पवारांची तत्परता!