Wed, Aug 12, 2020 09:19होमपेज › Ahamadnagar › कर्जत-जामखेडसाठी कृषी विज्ञान केंद्र

कर्जत-जामखेडसाठी कृषी विज्ञान केंद्र

Published On: Aug 20 2019 1:45AM | Last Updated: Aug 20 2019 1:45AM
जामखेड ः तालुका प्रतिनिधी

कर्जत-जामखेड तालुके कायम दुष्काळी असल्याने येथील शेती व्यवसाय हा नेहमीच अडचणीत सापडतो, या दुष्ट चक्रातून वाचविण्यासाठी व शेती व्यवसाय वाढविण्यासाठी बारामतीच्या धर्तीवर कर्जत-जामखेड मतदारसंघात कृषी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड येथील श्री. नागेश विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन काल. खा. पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील होते. यावेळी प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे, आ. दिलीपराव वळसे, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उपाध्यक्ष भगिरथी काका शिंदे, मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य मीनाताई जगधने, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, पुणे जि. प. सदस्य रोहित पवार, दादाभाऊ कळमकर, संस्थेचे सचिव भाऊसाहेब कराळे, घनश्याम शेलार, माजी जि. प. अध्यक्षा मंजुषा गुंंड, संजय नागापुरे, राजेंद्र कोठारी, प्रा.मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शरद भोरे, सुरेश भोसले, संजय वराट, हनुमंत पाटील, राजेंद्र पवार, शरद शिंदे, डॉ. कैलास हजारे, अमजद पठाण, नगरसेवक पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, काँग्रेस चे शहर अध्यक्ष जमिर सय्यद, प्रदीप पाटील, प्रशांत राळेभात, प्रकाश काळे,अमोल गिरमे, प्रा.लक्ष्मण ढेपे, संध्या सोनवणे, नागेश विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. काळे, मुख्याध्यापिका के. डी. चौधरी, अधीक्षक एन. बी. शिर्के उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील शेती पाण्याच्या नियोजनाभावी तोट्यात आहे. पावसाच्या लहरीपणामुळे कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने येथील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. म्हणून कर्जत-जामखेडला बारामती सारखे कृषी विज्ञान केंद्र उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. शेतकर्‍यांना ईस्त्राईलसारखी कमी पाण्यात जास्त प्रमाणात उत्पादन घेत आहेत, म्हणून शेती च्या प्रतवारीनुसार कोणते पीक घ्यावे, त्या पिकाला कमी पाण्यावर घेता येईल, यासाठी कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही पवार यांनी सांगितले. 

नागेश विद्यालयाची इमारत उभारण्यासाठी शहरवासीयांनी हातभार लावला.  22 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली संस्था हजारो विद्यार्थ्यांवर गेली आहे. रयत संस्था दुकानदारी करी नसून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था आहे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून देखील जामखेड तालुक्याचे नाव येथील स्वर्गीय रजनीकांत आरोळे यांच्यामुळे उंचावले आहे. यावेळी पवार यांनी राजकीय भाष्य करण्यास टाळले.
रोहित पवार यांनी सांगितले की, ज्येष्ठ नेते पवार यांनी रयत शिक्षण संस्थेत सर्वप्रथम सेमी इंग्लिश विभाग सुरु केला. लवकर सुशिक्षित बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबीर कर्जत-जामखेडमध्ये आयोजित करण्यात येईल.

नागरिकांना पाहताच काचा खाली

बर्‍याचदा नेत्यांच्या गाड्यांचा ताफा चालल्यानंतर त्या गाड्यांच्या काचा वर असतात, पण रोहित पवार याला अपवाद ठरले. शरद पवार व ते एकाच गाडीत बसले होते. गाडी सुरू होताच गाडीच्या दोन्ही बाजूंच्या काचा खाली घेत त्यांनी नागरिकांना हात बाहेर काढून अभिवादन केले. याबद्दल नागरिकांत चर्चा सुरू होती.