Fri, Sep 18, 2020 18:30होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : देशी बनावटीच्या पिस्तूलसह ३८ जिवंत काडतुसे जप्त

अहमदनगर : देशी बनावटीच्या पिस्तूलसह ३८ जिवंत काडतुसे जप्त

Last Updated: Feb 14 2020 4:24PM
संगमनेर : प्रतिनिधी

नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर (खुर्द) शिवारातील रायतेवाडी फाटा या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने देशी बनावटीचे पिस्तूल आणि ३८ काडतुसांसह सुमारे ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेतील पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

दिलीप कोंडीबा खाडे (वय २८, रा. म्हस्के बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे), बाबाजी बबन मुंजाळ (वय २७, रा. डोंगरगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) आणि दयानंद मारुती तेलंग (वय ३०, रा. टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

वाचा :  वाशिम : अंत्यविधीला जाताना काळाचा घाला

या घटनेबाबत संगमनेर शहर पोलिसांना गुप्त खबर्‍यामार्फत कोपरगावहून पुण्याच्या दिशेने एका मोटारीतून अवैध शस्त्रासह आणि काही युवक जाणार असल्याची माहिती उपधीक्षक रोशन पंडित यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिस निरीक्षक अभय परमार यांना सापळा लावण्याचे आदेश दिले. अभय परमार यांनी उप निरीक्षक संजय कवडे, सहायक पोलिस निरीक्षक एन. जी. साबळे, पोलिस नाईक विजय पवार, पोलिस काँस्टेबल सुभाष बोडके, अमृता आढाव, प्रमोद गाडेकर, साईनाथ तळेकर, आदी पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास  संगमनेर खुर्द शिवारातील रायतेवाडी फाट्याजवळ सापळा लावला होता.

वाचा : बेळगावात बँक लिपिकाकडून पत्नीचा खून

यानंतर काही वेळातच चार चाकी गाडी (क्र. एमएच १४, ३६००) पुण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसताच पोलिसांनी ती अडवली. त्यातील गाडी आणि तरूणाची झडती घेतली असता त्यांच्याजवळ पाच जीवंत काडतुसे असलेला देशी बनावटीचा कट्टा आणि केएफ ७. ६५ कॅलीबरची नोंद असलेली ३३ जीवंत काडतुसे सापडली. पोलिस पथकाने सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

वाचा : रायगड : उड्डाणपूलावरून कार कोसळली, ३ जखमी

पोलिस नाईक विजय पवार यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप कोंडीबा खाडे, बाबाजी बबन मुंजाळ आणि दयानंद मारुती तेलंग या तिघांच्याविरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

 "