Mon, Aug 10, 2020 05:37होमपेज › Ahamadnagar › यशश्री पतसंस्थेत ८० लाखांचा अपहार; सोने लिलावात गैरव्यवहार

यशश्री पतसंस्थेत ८० लाखांचा अपहार; सोने लिलावात गैरव्यवहार

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 09 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

माळीवाड्यातील यशश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील कार्यकारी संचालकाने गोल्ड व्हॅल्युअरला हाताशी धरून सोने तारण कर्ज लिलावात 80 लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी लेखापरीक्षकांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पतसंस्थेचा कार्यकारी संचालक मनीष शेषमल भंडारी, श्रीकांत वसंतराव लोणकर, संतोष शिवाजी दहिगावकर यांचा समावेश आहे. याबाबत लेखापरीक्षक नरेंद्र विठ्ठल वने (वय 32, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यशश्री महिला नागरी पतसंस्थेतील सोने लिलावाची जाहिरात न देताच बेकायदेशीरपणे लिलाव प्रक्रिया राबविली. यात पतसंस्थेच्या संचालकाने गोल्ड व्हॅल्युअर यांनी संगनमत करून सोने तारण कर्जाची लिलाव प्रक्रिया कागदोपत्री दाखवून 80 लाख 387 रुपयांच्या अपहार केला. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 दरम्यान हा गैरप्रकार झाला. 

संस्थेच्या आर्थिक लेखापरीक्षणात ही बाब उघड झाल्यानंतर लेखापरीक्षक नरेंद्र वने यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पतसंस्थेचे कार्यकारी संचालक व दोन सराफांविरुद्ध संगनमताने अपहार, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भुसारे हे करीत आहेत.