Sat, Sep 19, 2020 11:17होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्यात दिवसभरात २० कोरोना रुग्णांचा मृत्यू

नगर जिल्ह्यात दिवसभरात २० कोरोना रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Sep 10 2020 1:02AM
नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) दिवसभरात 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मरण पावणार्‍यांची संख्या आता 409 झाली आहे. दरम्यान, 766 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 875 झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 225 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 243, खासगी प्रयोगशाळेत  266 आणि अँटीजेन चाचणीत 257 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर 56, संगमनेर 42, पाथर्डी 21, नगर ग्रामीण 11, श्रीरामपूर 9, भिंगार 11,  नेवासे 33, श्रीगोंदे 14, पारनेर 1, अकोले 1, राहुरी 22, शेवगाव 2, कोपरगाव 15, जामखेड 3, कर्जत 1 आणि इतर जिल्हा 1 रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 266 रुग्ण आढळून आले. यामध्ये, नगर शहर 71, संगमनेर 17, राहाता 30, पाथर्डी 4, नगर ग्रामीण 30, श्रीरामपूर 34, भिंगार 3, नेवासे 10, श्रीगोंदे 2, पारनेर 5, अकोले 8, राहुरी 29, शेवगाव 5, कोपरगाव 2, जामखेड 16 रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 257 जण बाधित आढळून आले. यामध्ये, नगर शहर 68, संगमनेर 21, राहाता 10, नगर ग्रामीण 1, श्रीरामपूर 16, भिंगार 5,  नेवासे 22, श्रीगोंदे 30, पारनेर 7, अकोले 1, राहुरी 1, शेवगाव 32, जामखेड 14 आणि कर्जत 29 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल  567 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज दिला. यामध्ये, नगर शहर 177, संगमनेर 16, राहाता 54, पाथर्डी 8, नगर ग्रामीण 38, श्रीरामपूर 31, भिंगार 17,  नेवासे 43, श्रीगोंदे 34, पारनेर 23, अकोले 20, राहुरी 26, शेवगाव 46,  कोपरगाव 5, जामखेड 10, कर्जत 8, मिलिटरी हॉस्पिटल 10 आणि इतर जिल्हा 1 रुग्णांचा समावेश आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 23 हजार 241 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 83.38 टक्के झाले आहे.

 "