Wed, Aug 12, 2020 09:31होमपेज › Ahamadnagar › ...‘तर राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रीपद’  

...‘तर राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रीपद’  

Published On: Mar 27 2019 10:38PM | Last Updated: Mar 27 2019 10:38PM
राहुरी : प्रतिनिधी

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची रणधुमाळी पेटली असून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी आ. कर्डिले यांनी कंबर कासल्याचे दिसून येत आहे. 

राहुरी येथे आयोजित युतीच्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी घेणाऱ्यांचे वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही. माझा पराभव करून माझे अस्तित्व संपविण्यासाठी पवार यांनीच पुढाकार घेतला होता. मात्र, मी त्यातून सावरलो आहे. आजच्या मितीला मी किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांना खासदार करण्याचा शब्द आपण पाळणार आहोत. गत अनेक वर्षांपासून सुजय विखे यांना भाजपात आल्यास खासदार करतो आपण सांगत आलो होतो, त्यांनी ऐकले आहे. ते खासदार होणार असून आता राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये येऊन मंत्रीपद घ्यावे. त्यांना मंत्रिपद देण्यासाठी मी पुढे राहील अशी ग्वाही आ. कर्डीले यांनी दिली.

डॉ. सुजय विखे यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली. माझ्या पराभवासाठी सर्व एकवटले आहेत. मात्र, विखे यांची ताकद काय आहे ते 23 मे ला दाखवून देऊ असे यांनी माझ्या पुढे कोणीही टिकाव धरणार नसल्याचे विखे यांनी सांगितले.