होमपेज › Aarogya › नाकाच्या व्याधींच्या अंतरंगात...

नाकाच्या व्याधींच्या अंतरंगात...

Last Updated: Jan 09 2020 2:34AM
डॉ. प्राजक्‍ता पाटील

नाकांतील दुखणे हे नाकपुडीतील आणि नाकाच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील ज्याला ‘सायनस’ म्हणतात, त्यामधील दुखणे! साधारणपणे अ‍ॅलर्जिक र्‍हायनीटिस, सायनासायटिस, अँट्रीटिस, नाकांतील हाडाचे फ्रॅक्चर किंवा नाकपुडीत बाहेरून पदार्थ जाणे यामुळे नाकांमध्ये दुखतेे, वेदना होतात. 

त्वचेवरील संसर्ग, गाठी, धातू धुण्याच्या द्रवामुळे होणारे विष, दमटपणा, धुळीचा संसर्ग काढून टाकण्यासाठीची प्रक्रिया, मज्जातंतूच्या संवेदनातील अनियमितता यामुळेही नाकात दुखणे होते; परंतु हे प्रकार विरळ असतात. 

नाकातील दुखण्याची कारणे शोधता सध्या साधारणपणे नाकातील जळजळीचे रूपांतर गंभीर/जास्त जळजळीमध्ये होऊ नये यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजायचे त्याविषयी.....

नाकदुखीच्या सामान्य तक्रारी

1) अ‍ॅलर्जिक र्‍हायनीटिस ः परागकण, धूळ, हवामान बदल, अनावश्यक उगवलेली रानटी झुडपे इ.च्या अ‍ॅलर्जीमुळे नाकातील शेंबडासारख्या द्रवामध्ये होणारी जळजळ, चरचर म्हणजे अ‍ॅलर्जिक र्‍हायनीटीस. यामध्ये नाक खाजणे, डोळे खाजणे, नाक गच्च होणे, डोकेदुखी, नाकाचा वास कमी होणे, खोकला, कानाला दडे बसणे आणि कमालीचा थकवा, ही लक्षणे आढळतात. एकूण पूर्वेतिहास, दिसणारी लक्षणे आणि अ‍ॅलर्जी तपासणीचा एसिनोफिल काऊंट पाहिल्यावर या अ‍ॅलर्जीवरील उपाय करता येतो. 

2) सायनासायटिस ः गालाच्या आंतील बाजूतील आणि डोळ्यांच्या मागच्या तसेच, नाकपुडीच्या मागच्या पोकळीत जळजळ होणे, ठणकणे, याला ‘सायनासायटिस’ म्हणतात. विशेष करून श्‍वासनलिकेतील संसर्ग आणि अ‍ॅलर्जीमुळे सायनासायटिसचा त्रास होतो. खास करून, डोक्यातील सायनस हे खास लक्षण असते. ही डोक्यातील ठणठण सकाळी झोपून उठल्यावर, पुढे वाकल्यावर किंवा उष्ण वातावरणातून थंड वातावरणात गेल्यास वाढते. ही डोक्यातील ठणठण गालाच्या, डोळ्यांच्या आणि कपाळावर एकवटला जातो. ताप, चोंदलेले नाक, पिवळा-हिरवा द्रव नाकातून गळणे हीसुद्धा साधारण लक्षणे असतात. यापूर्वीची माहिती, एक्स-रे फोटो, सीटी स्कॅन/एमआरआय स्कॅन (चेहेर्‍याचा), नाकाची एंडोस्कोप यासारख्या उपाययोजनांनी, याचे रोगनिदान होते. 

3) अँट्रीटिस ः अँट्रीटिस म्हणजे जबड्याच्या पोकळीतील जळजळ. ही बॅक्टेरिया, बाहेरील जंतूंचा संसर्ग, फंगल किंवा अ‍ॅलजीर्र्मुळे होते. दातांच्या वेगवेगळ्या त्रासांमुळे श्‍वासोच्छ्वासातील संसर्ग, नाकांतून रक्‍त येणे ई. लक्षणांनंतर पुढची पायरी म्हणजे अँट्रीटिस. अशावेळी नाक चोंदणे, सायनसचा त्रास, डोकेदुखी, दातदुखी, नाकातून पिवळट हिरवट द्रव येणे ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात. शारीरिक तपासणी, सायनसेसचा एक्स-रे हे रोगनिदान करण्यासाठी उपयुक्‍त ठरतात. 

4) नाकाचे फ्रॅक्चर ः नाकाचे फ्रॅक्चर म्हणजे चेहर्‍याचे सर्वसाधारण फ्रॅक्चर होय. नाकाचे हाड म्हणजे नाकाचा कार्टिलेजचा पूल. त्याचे फ्रॅक्चर सहसा मानेच्या जखमेसोबत होते. गांभीर्य पाहून, नाकातून वाहणारे रक्‍त वेळेवर थांबविण्यासाठी वैद्यकीय मदतीची गरज असते; अन्यथा अधिक मोठी जखम होणे, नाकाची क्रिया बंद होणे इ. गंभीर समस्या उद्भवू शकतात. याची लक्षणे म्हणजे नाकातून रक्‍त वाहणे, नाक दुखणे, तसेच, श्‍वास घेण्यात अडचणी आणि नाक वाकडे होणे. शारीरिक तपासणी, एक्स-रे, चेहेर्‍याचा सीटी स्कॅन यावरून रेागनिदान होऊ शकते. 

5) दमटपणा/ओलसरपणा/गंज काढून टाकण्याच्या रसायनामुळे होणारा विषारी संसर्ग ः घरगुती साफसफाई करावयाच्या वेगवेगळ्या केमिकल्स/रसायनांचा वास घेतल्यामुळे किंवा ते पोटात गेल्यामुळे  गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असते. यामध्ये, हैड्रोजन पेरॉक्साईड, सोडीयम पेर्बोरेट, सोडियम हापोक्लोराईट अँड सोडियम पेरकार्बोनेट, अशी रसायने असतात, त्याचा शरीरातील वेगवेगळ्या यंत्रणांवर परिणाम होतो. याची सामान्य लक्षणे म्हणजे डोळ्यांत चुरचुरणे, नाक-ओठ-घसा यामध्ये जळजळणे, श्‍वास घेण्यास त्रास, उलटी होणे, पोटात दुखणे, बेशुद्ध होणे, रक्‍तदाब वाढणे, त्वचेवर पोळणे ही असून त्यासाठी वैद्यकीय मदतीची तातडीची गरज असते. 

6) नाकांत वाढणार्‍या लहान मृदू गाठी ः दीर्घ काळच्या दम्यामुळे, श्‍वासोच्छ्वासातील संसर्ग, अ‍ॅलर्जी, औषधे घेतल्याने होणार्‍या संवेदना यामुळे नाकांत अ‍ॅलर्जी, औषधे घेतल्याने होणार्‍या संवेदना यामुळे नाकांत मऊ, कर्करोग नसलेल्या छोट्या गाठी, अंगाची वाढ होते व त्या ठिकाणी जळजळ होते. याची लक्षणे म्हणजे चोंदलेले नाक, चव आणि वास न येेणे, घोरणे, चेहर्‍यावर दुखणे, डोकेदुखी आणि डोळ्यांत चुरचरणे. यासाठी नाकाची एंडोस्कोपी, सीटी स्कॅन/एमआरआय इमेजिंग आणि शारीरिक तपासणी इ.नंतर योग्य रोगनिदान होऊ शकते. यासाठी स्टिरॉईडस् गोळ्या घेणे, इनहेलेशन स्प्रे देणे, हा पहिला उपचार ठरतो. त्यामुळे फरक  पडत नसल्यास, शस्त्रक्रिया करणे जरुरीचे आहे. 

नाकांतील दुखण्यावरील औषधोपचार

नाकांतील दुखण्यावर उपचार करताना त्यामागचे मूळ कारण शोधून त्यावर औषधोपचार केले जातात. आजाराचे मूळ अ‍ॅलर्जी असेल तर अन्य उपचार बाजूला ठेवून, प्राधान्याने अ‍ॅलर्जीचे गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. गंभीर हल्‍ला रोखण्यासाठी अँटी हिस्टॉमिनस्, डीकंजेस्टंटस् आणि छडअखऊड यांचा उपयोग केला जातो. जखम असेल तर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, फक्‍त औषधोपचार की, शस्त्रक्रिया करावयाची हे ठरविले जाते. संसर्ग असल्यास अ‍ॅन्टीबायोटिक्स, छडअखऊड, नाक गळविणे आणि गरज असल्यास, कॉर्टीकोस्टेरॉईडस् श्‍वासाबरोबर ओढण्यास दिले जाते. अतिगंभीर सायनासायटिससाठी ‘एंडोस्कोपिक सायनस सर्जरी’ किंवा ‘बलून-हायनोप्लास्टी’ सुचविण्यात येते.