Sat, Apr 10, 2021 20:28
कसा असावा कोरोना रुग्‍णांचा आहार ...

Last Updated: Apr 07 2021 12:03PM

कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्‍या कोरोना विषाणूने पुन्‍हा एकदा डोके वर काढले आहे. देशभरात आलेल्‍या दुसर्‍या लाटेमुळे दररोज हजारोंच्‍या संख्‍येने रुग्‍ण वाढत आहेत. प्रतिबंधात्‍मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी, संतुलित आहार आणि व्‍यायाम यामुळेच कोरोनावर मात करता येते, असा मागील एक वर्षाचा अनुभव आहे. योग्‍य  आहार हाच प्रतिकारशक्‍ती वाढविण्‍याचे काम करतो. त्‍यामुळेच कोरोना लागण झालेल्‍या रुग्‍णांना देण्‍यात येणारा संतुलित आहाराचे महत्त्‍व अन्‍ययसाधारण आहे. जाणून घेवूया कोराेना रुग्‍णांसाठी आहार कसा असावा ते...

कोणत्‍याही आजारामध्‍ये विशेषत: सध्‍याच्‍या कोरोना विषाणू संसर्गामध्‍ये रुग्‍णाची प्रतिकार शक्‍ती कमी होत असते. त्‍यामुळेच कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांसाठी आहार व व्‍यायाम दोन्‍ही बाबी अत्‍यंत महत्त्‍वाच्‍या ठरतात, अशी माहिती कोल्‍हापूरमधील डॉक्‍टर अजय शिंदे यांनी दिली. त्‍याचबरोबर सकारात्‍मक मानसिकता ठेवणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले. संतुलित आहार कसा असावा आणि रुग्‍णांनी कोणत्‍या गोष्‍टी टाळाव्‍यात, याबाबत माहिती देताना डॉ. अजय शिंदे म्‍हणाले...

न्‍याहरी अत्‍यावश्‍यक...

New Balaji Uphar Gruh | Home delivery | Order online | Saraf-Bazar  Saraf-Bazar Amalner

सकाळची न्‍याहरी ही अत्‍यंत आवश्‍यक बाब आहे. कितीही धावपळ असली तरी निरोगी राहण्‍यासाठी आहारात न्‍याहरीचे महत्त्‍व अन्‍ययसाधारण आहे. यामध्‍ये पारंपरिक पौष्‍टीक नाष्‍टा जसे शिरा, पोहे, उप्‍पीट आदींचा समावेश करावा. न्‍याहरीच्‍या आहारात पुरेसे प्रथिने आणि कोर्बोहायड्रेट यांचे मिश्रण असावे. त्‍याचबरोबर फळे, दूध. अंडी यांचाही समावेश केल्‍यास प्रतिकार शक्‍ती वाढण्‍यास मदत होते.

दुपारी घ्‍यावा सकस आहार...

Sprouted Moth Masala Recipe, How To make Matki Chat » Maayeka

दुपारच्‍या जेवणात चपाती, पालेभाजी/फळभाजी, भात-वरण/आमटी हे आपण घेतोच. यामध्‍ये मोड आलेली धान्‍याचासु समावेश करावा. यामध्‍ये प्रथिने आणि झिंक असल्‍याने यामुळेही प्रतिकार शक्‍ती वाढते.  याचबरोबर गाजर, काकडी, बीट, मुळा अशा सॅलेडचाही वापर करावा. सायंकाळी केळ, नारळ पाणी घ्‍यावे. 

रात्रीचा आहार असावा हलका ... दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी आवश्‍यक

Are Some Fruits More Fattening Than Others? - Scientific American

सकाळी न्‍याहरी आणि दुपारी संतुलित आहात घेतल्‍यानंतर रात्रीचा आहार हा हलका असावा. त्‍याचबरोबर आहारात फळांचाही समावेश करावा. त्‍याचबरोबर दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी पिणे आवश्‍यक आहे. 

काय टाळावे..

कोणत्‍याही आजारामध्‍ये विशेषत: सध्‍याच्‍या कोरोना विषाणू संसर्गामध्‍ये रुग्‍णाची प्रतिकार शक्‍ती कमी होत असते. त्‍यामुळे शरीराला पोषक असाच आहार असावा. याकाळात पॅकबंद स्‍नॅक्‍स, चिप्‍स, बेकरी पदार्थ, फास्‍ट फूड खाणे टाळावे.  त्‍याचबरोबर पुन्‍हा-पुन्‍हा तळलेले तेलाचा वापरही करु नये. अलिकडे अजिनोमोटो, रंगीत द्रव्‍ये यांचा वापर वाढला आहे, याचा आरोग्‍यावर विपरित परिणाम होतो. त्‍यामुळे याचाही वापर टाळावा.

सॉफ्‍ट ड्रिंक्‍सला पर्याय...

Why You Should Start Your Day with Lemon Water - Joe Cross

कार्बोनेटेड सॉफ्‍ट ड्रिंक्‍स याचाही वापर करु नये. त्‍याऐवजी कैरीचे पन्‍हे, आवळा आणि लिंबू सरबत यामध्‍ये मुबलक व्‍हिटॅमिन सी असते. यामुळे प्रतिकार शक्‍ती वाढण्‍यास मदत होते. त्‍याचबरोबर टरबूज, खरबूज, कलिंगड या फळांचा रस, सरबत घ्‍यावा, यामध्‍ये भरपूर कॅल्‍शियम, पोटॅशियम व कॅलरी असते. याचा आहारात समावेश करावा.  

सकारात्‍मक मानसिकतेसाठी व्‍यायाम आवश्‍यकच

व्यायाम का महत्व (मानव जीवन में व्यायाम का महत्व) हिंदी निबंध (vyayam ka  mahatva essay in hindi)-Total Hindi Study

कोरोनामध्‍ये रुग्‍णास विलगीकरणात रहावे लागते. त्‍यामुळे त्‍याच्‍या मानसिकतेवर परिणाम होण्‍याची शक्‍यता असते. सकस आणि परिपूर्ण आहाराबरोबर मानसिक ताण कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे.  मोकळ्या हवेत फिरणे, व्‍यायाम आणि योगासने याचाही शरीर आणि मनावर सकारात्‍मक परिणाम होतो. कोणताही आजारामध्‍ये रुग्‍णाची मानसिकता सकारात्‍मक राहण्‍यासाठीही प्रयत्‍न करणे आवश्‍यक असते. त्‍यामुळेच कोरोनाची लागण झालेल्‍या रुग्‍णांनी संतुलित आहारातून प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍याबरोबरच मानसिक आरोग्‍यही जपणं महत्‍वाचे आहे.