Sat, Oct 24, 2020 08:33होमपेज › Aarogya › रक्त अ‍ॅसिडीक होणे घातक

रक्त अ‍ॅसिडीक होणे घातक

Last Updated: Oct 14 2020 8:21PM
प्रमोद ढेरे

तुमच्या रक्ताचा पीएच सामान्य म्हणजे 7.4 असला पाहिजे, कारण जर तुमचे रक्त अ‍ॅसिडीक झाले तर तुमच्या शरीरातील रक्त सोडून असणारे इतर द्रव जसे लाळ, लघवी, बाईल ज्युस (पित्त), अश्रू, स्त्रियांच्या गर्भाशयातील द्रव, पुरुषांचे वीर्य असे इतर द्रवसुद्धा अ‍ॅसिडीक होतात व त्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. 

तुम्ही कॅल्शियम प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर जेवढे पाहिजे तेवढेच कॅल्शियम तुमचे शरीर घेते व जे जादाचे कॅल्शियम असते ते किडनीच्या माध्यमातून लघवीवाटे बाहेर टाकण्याची निसर्गदत्त यंत्रणा तुमच्या शरीरात असते; पण ही यंत्रणा कधी काम करते? तर तुमच्या लघवीचा पीएच सामान्य असेल तेव्हा म्हणजेच लघवी अ‍ॅसिडीक नसेल, सामान्य असेल तेव्हाच. कारण लघवीसुद्धा रक्तापासूनच वेगळी होत असते. त्यामुळे तुमचे रक्त अ‍ॅसिडीक झाले तर तुमची लघवीही अ‍ॅसिडीक होते, त्यामुळे जादाचे कॅल्शियम जे किडनीच्या माध्यमातून लघवीवाटे बाहेर टाकले गेले पाहिजे ते बाहेर टाकले जात नाही, ते किडनीतच जमा व्हायला लागते व कालांतराने जमा होत होत तिथं त्या कॅल्शियमचा खडा तयार होतो, ज्याला आपण मुतखडा म्हणतो. म्हणजे तुमचे रक्त अ‍ॅसिडीक होण्यामुळेच तुम्हाला मुतखडा होतो. 

दुसरं उदाहरण म्हणजे पित्ताचा खडा. तुमचं पित्त म्हणजेच बाईल ज्युस जर अ‍ॅसिडीक झालं तर ते पित्ताशयातच पडून राहतं, ते पित्ताशयातून बाहेरच पडत नाही आणि पित्ताशयात पडून पडून कालांतराने तिथं त्याचा खडा तयार होतो, त्याला आपण पित्ताचा खडा म्हणतो. म्हणजे पित्ताचा खडा होणे हे सुद्धा तुमचे रक्त सिडीक होण्यामुळेच होतो. हे दुसरं उदाहरण.

स्त्रियांच्या गर्भाशयातील द्रव व पुरुषांचे वीर्य जर अ‍ॅसिडीक झाले तर वंध्यत्वाची (खपषशीींळश्रळीूं) समस्या निश्चितच निर्माण होते. म्हणजेच वंध्यत्वाची समस्यासुद्धा तुमचे रक्त अ‍ॅसिडीक होण्यामुळे होते. त्यामुळे आता जास्त खोलात न जाता रक्त अ‍ॅसिडीक होऊ नये म्हणून काय करायला हवे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.रक्त अ‍ॅसिडीक होऊ नये म्हणून करायला हवी ती पहिली गोष्ट म्हणजे दररोच तीन ते चार लिटर पाणी शिस्तबद्ध पद्धतीने पिलेच पाहिजे. 

एखाद्या दिवशी जर तुम्ही पाणी कमी पिलं असेल तर त्या दिवशी संध्याकाळी तुमची लघवी पिवळी होते, लघवी करताना जळजळतं म्हणजेच तुमची लघवी अ‍ॅसिडीक झाली. म्हणजेच तुमचं रक्त अ‍ॅसिडीक झालं. कारण लघवी रक्तापासूनच वेगळी होत असते. मात्र, एखाद्या दिवशी जर तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने पुरेसे पाणी पिले असेल तर नेहमी तुमची लघवी पांढरीशुभ्र होते. म्हणजे लघवी अ‍ॅसिडीक नाही, म्हणजेच रक्त अ‍ॅसिडीक नाही. अशाप्रकारे तुमचे शरीर तुम्हाला सूचना देत असते; पण ते लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणून तर जुनी लोकं सांगायची पाणी जास्त पी नाहीतर मुतखडा होईल. रक्त अ‍ॅसिडीक होऊ नये म्हणून करायला हवी ती दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अ‍ॅसिडीक (आम्लिय) आहार व अल्कलाईन (क्षारीय) आहार यांचे संतुलन राखणे. 

आपला आहार प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो - अ‍ॅसिडीक आहार आणि अल्कलाईन आहार. अ‍ॅसिडीक आहार कोणता तर ज्याने अ‍ॅसिडीटी होते तो आहार आणि अल्कलाईन आहार कोणता तर ज्याने अ‍ॅसिडीटी होत नाही तो आहार. मग अ‍ॅसिडीक आहार कोणता? तर जास्त तेलकट, जास्त तिखट, जास्त मसालेदार, जास्त मांसाहार, ज्याने अ‍ॅसिडीटी होते. आणि क्षारीय आहार कोणता? तर फळं, भाज्या, दूध, मोड आलेली कडधान्ये, ज्याने अ‍ॅसिडीटी होत नाही. याचा असाही अर्थ होत नाही की, अ‍ॅसिडीक आहार खाऊच नये. नक्कीच खाल्ला पाहिजे, जिभेचे चोचले पण पुरवले पाहिजेत; पण प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

आता हे प्रमाण कसे असावे? जर तुम्ही निरोगी असाल तर हे प्रमाण साठ /चाळीस टक्के असावे. म्हणजे तुम्ही चाळीस टक्के अ‍ॅसिडीक खा व साठ टक्के अल्कलाईन खा. मात्र, तुम्ही आजारी असाल आणि आजारातून तुम्हाला बरे व्हायचे असेल तर हेच प्रमाण ऐंशी /वीस टक्के असावे. ऐंशी टक्के म्हणजे जास्तीतजास्त अल्कलाईन खा. तेव्हा तुम्ही आजारातून लवकर बरे व्हाल. म्हणूनच जेव्हा तुम्ही आजारी पडता व डॉक्टरांकडे जाता तेंव्हा डॉक्टर तुम्हाला तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका, मसालेदार खाऊ नका, मांसाहार करू नका, असे सांगतात. शिवाय एकाच आजाराच्या दहा रुग्णांना जर आपण एकसारखी ट्रीटमेंट दिली तर काहींना गुण लवकर येतो, काहींना गुण यायला वेळ लागतो तर काहींना गुण यायला फारच वेळ लागतो. याचा संबंध पाणी पिण्याच्या सवयीशी व ते कोणत्या प्रकारचा आहार घेतात याच्याशी येतो.म्हणूनच रक्त अ‍ॅसिडीक होऊ नये म्हणून शिस्तबद्ध पद्धतीने पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा व आपल्या आहारात अ‍ॅसिडीक आहार व अल्कलाईन आहार यांचे संतुलनही अवश्य ठेवा.

 "