Mon, Jan 25, 2021 06:16होमपेज › Aarogya › ‘संतुलित’ आरोग्यासाठी...

‘संतुलित’ आरोग्यासाठी...

Last Updated: Feb 13 2020 1:36AM
डॉ. संजय गायकवाड

शरीर निरोगी राखण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामाची सांगड घालावी लागते. त्याचबरोबर मन, मेंदूची जपणूकही महत्त्वाची आहे. शरीर आणि मन दोन्ही संतुलित नसेल तर शरीर संतुलित राहणार नाही. मनाची काळजी कशी घ्यावी, ते समजून घेतले पाहिजे. 

मन आणि शरीर संतुलित नसेल तर संपूर्ण आरोग्याविषयीदेखील आपण फारसा विचार करू शकत नाही. शरीर चांगले राखण्यासाठी केवळ संतुलित आहार पुरेसा नाही, तर मेंदूलाही चांगल्या सकारात्मक विचारांचा खुराक वेळच्या वेळी मिळणे गरजेचे आहे. मन आणि शरीर दोन्ही संतुलित असेल तरच संपूर्ण आरोग्य चांगले राहते. मन आणि शरीर यांचे संतुलन व्यक्‍तीच्या चांगल्या शारीरिक, मानसिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे. आरोग्याचे तीन मुख्य घटक आहेत, ते म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक. प्रत्येक घटक समसमान पातळीवर महत्त्वाचे आहेत. मेंदू आणि शरीराचे संतुलन असेल तर ती व्यक्‍तीला आरोग्य, ऊर्जा, ज्ञान, चेतना आणि उद्देश यांना एका वरच्या पातळीवर घेऊन जाते. ही मन आणि शरीराची एकीकरण अवस्था असते.

ध्यानधारणा हा एक अभ्यासच आहे. ध्यान करताना व्यक्‍ती सचेतन राहून किंवा एखाद्या विशिष्ट वस्तू, विचार किंवा हालचाली वर लक्ष केंद्रित करून मनोयोग आणि सतर्कता यासाठी प्रशिक्षित करते. त्यामुळे व्यक्‍ती मानसिक आणि भावनिक दोन्ही रूपांमध्ये शांत अवस्थेत पोहोचते. ध्यान तसेच योग अभ्यास व्यक्‍तीला शरीर तसेच मेंदूशी जोडल्याचा अनुभव देऊ करते. ध्यान व्यक्‍तीला विचारांच्या ओझ्यापासून वर काढून शांतता आणि एकाच जागी थांबण्याच्या शुद्ध जागृतीच्या स्थितीमध्ये पोहोचवतो. आरोग्याविषयी विचार करतो तेव्हा त्यात आहार आणि व्यायाम याबाबतचा विचार सर्वप्रथम मनात येतो; मात्र चांगले आरोग्य याचा अर्थ केवळ शारीरिक आरोग्य किंवा ठेवण नाही. तर तो मनाशीही निगडित आहे. आपले शरीर आणि मेंदू हे परस्परांशी निगडित आहे. शिवाय ते एकमेकांवर खूप जास्त प्रभाव टाकतात.

ध्यानधारणेमुळे आपली स्मृती, एकाग्रता, मनःस्थिती, रोगप्रतिकारक क्षमता, झोप तसेच सर्जनशीलता हे सर्व गुण अधिक चांगले विकसित होतात. त्यामुळे योग आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीच उपयुक्‍त आहे. शरीर मजबूत आणि लवचीक होण्यास मदत होतेच; शिवाय मेंदू शांत राखण्यासही मदत होते. मेंदू, शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी आध्यात्मिक गरजेनुसार संपूर्ण योग्य पोषण करणे गरजेचे आहे. मेंदू आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेले आहेत; परंतु ही स्थिती चमत्कारिक आहे. मेंदू आणि शरीर यांची मिळून शक्‍ती समजून घेणे, त्यांना मदत करणे तसेच शक्‍तीचा वापर करणे हे तीन मुख्य आधार आहेत. चिंतन हा प्रकारदेखील यौगिक मंत्र-ध्यान क्रिया आहे. व्यक्‍ती या पद्धतीने मेंदू शांत करून घेतो, तेव्हा अनेक आजारांमध्ये त्याचा फायदा होतो. हृदयगती मंदावणे, रक्‍तदाब, तणाव, हार्मोन्सच्या पातळी कमी होणे आणि इतर शारीरिक व्याधींमध्ये ध्यानधारणेचा फायदा होतो. शरीर आणि मेंदू यांच्यावरही त्याचा प्रभाव पडतो. व्यायाम केल्याने मनोवस्था अधिक चांगली होते, असे म्हटले जाते. 

शरीराला तेलाने केलेली मालिश आणि गरम पाण्याने केलेली अंघोळही मनाला सुखावून जाते. त्यामुळे तणावमुक्‍त होता येते. मुळातच व्यक्‍तीची अशी धारणा असते की, शरीर आणि मेंदू दोन्हींचे अस्तित्व वेगळेे असते; परंतु व्यक्‍तीच्या भावनात्मक परिस्थितीतून हेच जाणवते की, मेंदू आणि शरीर हे दोन्ही एकमेकांशी निगडित आहेत. शरीर आणि मेंदूचे संतुलन, विविध आरोग्यदायी आणि ऊर्जात्मक पद्धतींना एक करून टाकते. मेंदूमध्ये उलथापालथ करत असणार्‍या भावनांचे समाधान यामुळे होते. भावना संतुलित झाल्यानंतर व्यक्‍ती काहीच मिनिटांत तणावातून बाहेर पडतात.  मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य खूप महत्त्वाची आहेत. या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधणे हीच मोठी महत्त्वाची बाब आहे. जसे जसे आपण मनाच्या आरोग्याबाबत जागरूक होतो, ही जागरूकता अधिक खोलवर रूजते, तेव्हा शारीरिक संवेदना जीवनाच्या प्रत्येक पैलूच्या दिशेने निर्देश देऊ लागतात. त्यांच्या मदतीने व्यक्‍तीला तणाव कमी करता येतो आणि तो आपले आयुष्य संतुलित करतो. आपल्या आरोग्याची जन्मजात क्षमता, रचनात्मकता आणि आध्यात्मिक विकास यांना सर्वोच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतो. जीवन संतुलन ही वास्तविक मृगतृष्णा आहे. आपण जितके त्याच्या जवळ जाऊन ते तिथून लांब पळते. ही एक मानसिक अवस्था आहे. व्यक्‍तीच्या आतच संतुलन असते. जे काही घडते आहे, त्याच्या केंद्रात कसे राहता येईल. ही गोष्ट प्रत्येकाच्या पात्रतेवर अवलंबून असते. मन आणि शरीर या दोघांचे संतुलन प्रत्येक वय आणि वयाच्या प्रत्येक अवस्थेत चांगले आणि तंदुरुस्त राखते. त्यामुळे स्वतःला वेळ दिला, स्वतःची काळजी घेतल्याचे समाधान यातून मिळते. 

* नकारात्मक विचारांपासून बचाव करणे फार महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचार अनेक आजारांचे मूळ असू शकते. 
* व्यग्र दिनचर्येतून स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. स्वतःशी संवाद साधा. व्यायाम करा, खेळासारख्या गोष्टीत सामील व्हा. या सर्व गोष्टी आत्मविश्‍वास वाढवतात. 
* दररोज योगाभ्यास करावा. योगामुळे शरीर मजबूत आणि लवचीक होते. त्याचबरोबर मेंदू म्हणजे डोके शांत राहण्यास मदत होते.  
* लहान लहान गोष्टींतील आनंद घ्या. त्यातच जीवनाचे सार सामावले आहे.