अनशापोटी करा गुळाचे सेवन

Last Updated: Nov 07 2019 2:06AM
Responsive image


आरोग्यासाठी गूळ चांगलाच असतो हे सर्वांना माहीत असते. अनशापोटी गूळ खाल्ल्यास 4 फायदे होतात. आपल्यापैकी बहुतेक लोक रात्री जेवल्यानंतर गूळ खातात. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. सकाळी अनशापोटी गूळ खाल्ल्यावर कोमट पाणी प्यायल्यास त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. 

रक्‍तदाब नियंत्रणात राहतो

रक्‍तदाब नियंत्रणासाठी गूळ प्रभावी ठरतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळते. दोन्ही घटक हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून मुक्‍ती मिळते. 

रक्‍त साफ होते 

सकाळी अनशापोटी गूळ खाऊन कोमट पाणी प्यायल्यास रक्‍त स्वच्छ होते. त्यामुळे नवीन रक्‍त तयार होते. हृदयरोग होण्याचा धोका दूर ठेवण्यासही गुळाच्या सेवनाचा फायदा होता. 

शरीराला मिळते ताकद 

गुळाच्या नियमित सेवनाने शरीर ताकदवान होते. दिवसभराचा थकवा दूर होण्यासही मदत होते. शरीरात ऊर्जा पातळी कायम राहते आणि ती कमी होत नाही. 

पचनसंस्था मजबूत होते

ज्या लोकांना आहार सहजपणे पचवण्यात अडचणी येतात त्यांनी गूळ आणि गरम पाणी सेवन करावे. या व्यक्‍तींसाठी ते औषधासारखे काम करते. त्याचबरोबर बद्धकोष्ठता, पोटात वायू होणे, अ‍ॅसिडीटीसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.