मेष
नकारात्मक बोलणे, चर्चा करणे टाळावे. योग्य कामांमध्ये स्वतःला गुंतवा. अनपेक्षितपणे खर्चदेखील होतील.
वृषभ
खर्या प्रेमाचा अनुभव येईल. क्षणिक अडचणी निर्माण होतील. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ याप्रमाणे वागाल, ते लाभदायकच ठरेल.
मिथुन
सकारात्मक विचार आत्मविश्वास वाढवेल. प्रकृतीविषयी चिंता नको. तुमच्यामुळे सर्वजण आनंदी होतील.
कर्क
मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. नको त्या गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनःस्वास्थ्य बिघडेल.
सिंह
क्रीडा क्षेत्रातील लोकांना विशेष लाभदायक दिवस ठरेल. आई-वडिलांची सेवा आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे.
कन्या
प्रसन्नता लाभेल. चेहर्यावरील तेज वाढेल. नव्या ओळखी होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
तूळ
मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम राहील. घरातील सदस्यांना अडचणी निर्माण होतील. मार्गदर्शनाने मार्ग मिळेल.
वृश्चिक
अहंकार सोडा. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. ताणतणावापासून दूर राहा. आराम करण्याचा प्रयत्न करा.
धनु
व्यावहारिक सावधानता बाळगा. आपल्या वस्तू सांभाळा. चर्चा करूनच निर्णय घ्या.
मकर
आज वातावरण प्रसन्न राहील. बुद्धिचातुर्याने गुंतवणूक कराल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल.
कुंभ
आर्थिक परिस्थिती बेताची होईल. मनाविरुद्ध घटना घडतील. वेळेचे नियोजन आवश्यक.
मीन
आनंददायी दिवस. मनासारख्या घटना घडतील. अध्यात्मिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस.