pudharinews

Supreme Court | रेल्वेच्या खिडकी तिकिटांवरही विमा संरक्षण बंधनकारक; २७ ऑक्टोबरपासून निर्णय लागू
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय रेल्वेला खिडकीवरून (ऑफलाईन आरक्षण काऊंटर) तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही ऑनलाईन तिकिटांप्रमाणेच प्रवास विमा संरक्षण देण्याचे स्पष्ट आदेश दिले. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्णय देत, येत्या दोन आठवड्यांत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.  २७ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व आरक्षण खिडक्यांवर ही सुविधा अनिवार्यपणे सुरू करावी लागेल.

देशभरातील रेल्वे सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्या. आर. माधवन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू असताना हा मुद्दा समोर आला. न्यायालयीन मित्र ज्येष्ठ वकील शिखिल सुरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ऑनलाईन प्रवाशांना विमा मिळतो; परंतु ऑफलाईन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वेने अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत. यावर न्यायालयाने रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजित बॅनर्जी यांना जाब विचारला की, ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवाशांमध्ये असा भेदभाव का केला जात आहे?

न्यायालयाने स्पष्ट केले की, २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत देशभरातील सर्व आरक्षण खिडक्यांवर ही सुविधा लागू झाली नाही, तर त्यासाठी थेट रेल्वे बोर्डाचे नेतृत्व जबाबदार राहील. उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.

सर्वसामान्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

न्यायालयाने अधोरेखित केले की, रेल्वेस्थानकांवरील आरक्षण खिडकीवरून तिकीट काढणारे प्रवासी हे प्रामुख्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. अशा गरीब आणि सामान्य प्रवाशांना प्रवासादरम्यान विम्याच्या संरक्षणाची खरी व सर्वाधिक गरज असते. सध्या ऑनलाईन तिकिटावर प्रतिप्रवासी अवघ्या ४५ पैशांत (करांसहित) अपघात विमा मिळतो. यामध्ये अपघातात जखमी झाल्यास उपचाराचा खर्च, कायमस्वरूपी अपंगत्व, मृत्यू झाल्यास आर्थिक भरपाई आणि पार्थिव घरी पोहोचवण्याच्या खर्चाचा समावेश असतो. हेच कवच आता खिडकी तिकिटांवरही दिले जाईल.

October Heat | मान्‍सूनच्‍या माघारीनंतर राज्‍यात ‘ऑक्‍टोबर हीट’चा तडाखा
मुंबई : मान्‍सून माघारी फिरल्‍यानंतर राज्यात सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा जोरदार तडाखा बसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीच्या तापमानात मोठी वाढ झाल्‍याने होरपळून जावे, अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्‍ट्रातही उन्‍हाचे चटके बसू लागले आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्‍यान, बुधवारी राज्याचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचला. दरम्यान, रत्नागिरी येथे ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. असे असले तरी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत गुरुवार (दि. १५) पासून मंगळवार (दि. २०) पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातून परतीचा मान्सून न बरसता लवकरच गेला, तसेच यंदा ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे तापमानवाढ प्रचंड वेगाने होत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्याचा पारा सतत ३८ अंशांवर आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीच्या भागात तापमान वेगाने वाढत आहे. विदर्भातील बहुतांश भाग प्रथम तापला असून उष्णतेमुळे सर्वच भागांत कमालीचा उष्मा जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या सुधारित अंदाजानुसार, आजपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळीमुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी शेतकरीवर्गाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दक्षता घेण्‍याचे आवाहन

सतत वाढत असलेल्‍या तापमानाचा राज्‍यातील नागरिकांच्‍या आरोग्‍यावरही परिणाम होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. काही भागात सर्दी, खोकला, तापाचे रुग्‍ण आढळत आहेत. त्‍यामुळे उन्‍हात जाताना काळजी घ्‍यावी, असे आवाहन आरोग्‍य प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

Canada Archaeological Discovery | कॅनडात युरोपीय व्यक्तीचे ७०० वर्षे जुने आदिवासी शिल्प
टोरांटो : उत्तर कॅनडातील बॅफिन बेटावर इन्युईट पूर्वजांच्या एका प्राचीन घरात १९७७ मध्ये हे लाकडी शिल्प सापडले होते. या अद्वितीय कोरीव शिल्पात युरोपीय पोशाख परिधान केलेली आणि छातीवर क्रॉस (खूण) असलेली एक व्यक्ती दर्शवली आहे. १३५० मधील हे शिल्प पश्चिम गोलार्धात युरोपीय व्यक्तीचे सर्वात जुने आदिवासी चित्रण आहे आणि शक्यतो यात एका नॉर्समनचे (स्कँडिनेव्हियन व्यक्तीचे) चित्रण असावे. कोलंबसने अमेरिकेचा ‘शोध’ लावण्यापूर्वीचे हे शिल्प आहे हे विशेष!

कॅनडियन म्युझियम ऑफ हिस्ट्रीमध्ये सध्या प्रदर्शित केलेल्या या छोट्या लाकडी शिल्पाची लांबी अवघ्या २.१ इंच (५.४ सेंटिमीटर) इतकी आहे. संग्रहालयाच्या मते, १४ व्या शतकातील इन्युईट कोरीव कामांमध्ये चेहऱ्याविना असणारा चेहरा आणि आखूड हात सामान्य मानले जातात; परंतु एका बिगर-इन्युईट (परदेशी) व्यक्तीचे चित्रण हे अत्यंत अद्वितीय आहे. या गूढ आकृतीने पुढच्या बाजूस क्रॉस असलेला लांब कोट किंवा ट्यूनिक परिधान केला आहे. हा पोशाख ११ व्या ते १३ व्या शतकात ग्रीनलँडमधील नॉर्स ख्रिश्चनांनी घातलेल्या कपड्यांसारखाच आहे. नॉर्स गाथांमध्ये ‘हेलुलँड’ नावाच्या ठिकाणाचा उल्लेख आढळतो, ज्याला लीफ एरिकसन यांनी ११ व्या शतकाच्या सुरुवातीला भेट दिली होती आणि हे ठिकाण बहुधा बॅफिन बेटच असावे.

इसवी सन १००० च्या सुमारास, नॉर्स संशोधक सध्याच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उतरले आणि त्यांनी पुरातत्त्वशास्त्रज्ञ ज्याला ‘लान्स औ मेडोज’ म्हणतात तिथे तळ ठोकला. अमेरिकेतील या सर्वात जुन्या युरोपीय वसाहतीचे आज केवळ लाकडी इमारती आणि लोखंड निर्मितीचे अवशेष शिल्लक आहेत. इन्युईटच्या पूर्वजांना ‘थुले’ म्हणून ओळखले जाते. नॉर्स लोकांनी इन्युईटच्या पूर्वजांशी धातू आणि कापडाचा व्यापार करण्यासाठी आणि बदल्यात वॅलरसचे सुळे (हाडे) मिळवण्यासाठी शतकानुशतके ग्रीनलँडमधून कॅनडामध्ये अनेक फेऱ्या मारल्या असाव्यात, कारण बॅफिन बेटावरील प्राचीन इन्युईट घरांमध्ये युरोपीय बनावटीच्या वस्तू सापडल्या आहेत. परंतु, स्थानिक आदिवासींचा विरोध आणि जास्त अंतर यामुळे नॉर्स लोकांनी अखेर त्यांचे पश्चिमेकडील व्यापारी मार्ग बंद केले.

पहिला चहा : दिवसाआड पाणी...
भाऊसाहेब : गणपतराव, आज तुमच्या घरी पाणी आलं का?

गणपतराव : नाही हो! आज येणार नाही. काल आलं होतं ना!

भाऊसाहेब : पाण्यालाही   दिवसाआड सुट्टी मिळते; पण  आपल्याला तर रोज अंघोळ करावी लागते!

गणपतराव : अहो, अंघोळीवर थोडीच बंदी घातलीय!

भाऊसाहेब : कालच्या पाण्यात भांडी घासली, कपडे धुतले, स्वयंपाक केला.

गणपतराव : आणि अंघोळ?

भाऊसाहेब : नाही! बायको म्हणाली, उद्या करा. पाणी वाचवा!

गणपतराव : वा! म्हणजे आता घरात स्वच्छतेपेक्षा जलसंधारणाला महत्त्व आलंय! मी तर पाण्याचा हिशेब वहीत लिहून ठेवतो.

भाऊसाहेब : कशाला?

गणपतराव : पुढच्या पावसाळ्यापर्यंत किती पाणी पुरेल, याचा अंदाज घ्यायला!

भाऊसाहेब : मग किती दिवस पुरणार?

गणपतराव : पुरेल; पण घरातल्या माणसांच्या अंघोळीचा हिशेब काही जुळत नाही.

भाऊसाहेब : खरंय! काल नातू म्हणाला, पोहायला शिकायचंय! मी म्हटलं, बाळा, आधी बादलीत पाय भिजवायला शिक. पोहण्याचा विचार पुढच्या पावसाळ्यात करू!

गणपतराव : (हसत) अहो, आमचा नातू पाण्याचा नळ म्हणाला, आजोबा, नळातून पाणी येत नाही, मग हा नळ बंद का करायचा?

भाऊसाहेब : लहान मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा दुष्काळाला उत्तर शोधणं सोपं आहे.

गणपतराव : पण, पाणी वाचवायचं कसं?

भाऊसाहेब : सोपं आहे! दात घासताना नळ बंद, भांडी घासताना पाणी जपून, गळती असेल, तर ताबडतोब दुरुस्ती आणि पावसाचं पाणी साठवण्याची सोय!

गणपतराव : सोसायटीच्या अध्यक्षांनी काल सभा घेतली. म्हणाले, प्रत्येक थेंब जपून वापरा!

भाऊसाहेब : छानच!

गणपतराव : हो! पण, भाषण झाल्यावर हात धुवायला नळ पूर्ण उघडा ठेवला होता.

भाऊसाहेब : (डोक्याला हात ) म्हणजे पाणी कमी पडतं ते फक्त आभाळामुळे नाही, तर काही लोकांच्या सवयींमुळेही!

गणपतराव : खरंय! पाऊस कधी पडेल हे आपल्या हातात नाही; पण पडलेल्या पाण्याचा थेंब न् थेंब जपणं आपल्या हातात आहे.

भाऊसाहेब : अगदी बरोबर! आजपासून पाणी जपून वापरायचं आणि पावसाचं पाणी साठवायची सोय करायची.

गणपतराव : हो! कारण, पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवायचं असेल, तर आजच शहाणं व्हायला हवं!

Francis Halzen | फ्रान्सिस हाल्झेन
मुरलीधर कुलकर्णी

यंदाचे  भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक बेल्जियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाले. ‘आईसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’ मधील त्यांच्या क्रांतिकारी योगदानासाठी आणि अंतराळातील उच्च ऊर्जा न्यूट्रिनोच्या शोधासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे, १९९२ नंतर प्रथमच भौतिकशास्त्राचा हा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे न देता केवळ एकाच व्यक्तीला प्रदान करण्यात आला आहे, यावरून या संशोधनाची महती स्पष्ट होते.

फ्रान्सिस हाल्झेन यांचा जन्म २३ मार्च १९४४ रोजी बेल्जियममधील लेउव्हेन शहरात झाला. त्यांचे कुटुंब शैक्षणिक आणि बौद्धिक वातावरणाशी जोडलेले होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान, खगोलशास्त्र आणि निसर्गाच्या गूढ नियमांबद्दल कमालीचे कुतूहल होते. त्यांचे शालेय आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण बेल्जियममध्येच झाले. त्यांनी कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ लेउव्हेन मधून भौतिकशास्त्रात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच भौतिकशास्त्राच्या क्लिष्ट सिद्धांतांमध्ये विशेष रुची असल्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्रातच आपले करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. पुढे संशोधनाच्या ओढीने ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि सध्या ते विसकॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

फ्रान्सिस हाल्झेन यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा म्हणजे अंटार्क्टिकाच्या गोठवणाऱ्या बर्फाखाली IceCube Neutrino Observatory नावाच्या जगातील सर्वात मोठ्या न्यूट्रिनो दुर्बिणीच्या कल्पनेचे आणि प्रकल्पाचे नेतृत्व करणे होय. न्यूट्रिनो हे अत्यंत सूक्ष्म उपअणू कण आहेत, ज्यांना कोणताही विद्युत भार नसतो आणि त्यांचे वस्तुमान नगण्य असते. हे कण मानवी शरीरातून किंवा संपूर्ण पृथ्वीवरून सेकंदाला काही ट्रिलियनच्या संख्येने न अडकता आरपार निघून जातात, म्हणूनच त्यांना ‘गोस्ट पार्टिकल्स’ किंवा ‘भूत कण’ म्हणून ओळखले जाते. विश्वाच्या दूरच्या कोपऱ्यातील ब्लॅक होल किंवा सुपरनोव्हासारख्या अतिकठीण ठिकाणांवरून प्रवास करून येणारे हे कण कुठेही न थकता थेट पृथ्वीवर पोहोचतात. विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ शोधण्यासाठी हे कण अत्यंत महत्त्वाचे दुवे मानले जातात; परंतु ते अदृश्य आणि कशाशीही न चिकटणारे असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे हे वैज्ञानिकांसमोर मोठे आव्हान होते.

या समस्येवर मात करण्यासाठी हाल्झेन यांनी अंटार्क्टिकाच्या एका घन किलोमीटर बर्फाखाली हजारो सेन्सर्स पसरवून ही अनोखी दुर्बीण उभी केली. जेव्हा एखादा न्यूट्रिनो बर्फातील अणूंच्या केंद्रांशी आदळतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या सूक्ष्म निळ्या प्रकाशाला हे सेन्सर्स टिपतात. त्यांच्या या अभूतपूर्व प्रकल्पामुळे ‘न्यूट्रिनो अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ या नवीन शाखेचा जन्म झाला. त्यांच्या या क्रांतिकारी संशोधनामुळे शास्त्रज्ञांना आपल्या आकाशगंगेव्यतिरिक्त इतर दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या उच्च ऊर्जा न्यूट्रिनोचे पहिले थेट पुरावे मिळाले.

आपल्या खडतर आणि प्रेरणादायी वैज्ञानिक प्रवासात फ्रान्सिस हाल्झेन यांना जगभरात अनेक प्रतिष्ठित मानसन्मान लाभले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांनी त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना गौरव, फेलोशिप्स आणि पदके प्रदान केली आहेत. आता त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक हे त्यांच्या अनेक दशकांच्या अथक संशोधनाचे आणि वैज्ञानिक निष्ठेचे सर्वोच्च फलित आहे. हाल्झेन यांच्या या महान शोधामुळे मानवतेचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असून, खगोलशास्त्रात एका नवीन युगाची पायाभरणी झाली आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.

Netflix Lays Off : नेटफ्लिक्सचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; तब्बल १,००० कर्मचाऱ्यांची करणार कपात!
नवी दिल्ली : जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेली आघाडीची ओटीटी कंपनी 'नेटफ्लिक्स'ने (Netflix) आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ६ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात मानली जात आहे.

वृत्तानुसार, या निर्णयामुळे सुमारे १,००० कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. सध्या नेटफ्लिक्समध्ये जगभरात सुमारे १६,००० पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-CEOs) टेड सारँडोस (Ted Sarandos) आणि ग्रेग पीटर्स (Greg Peters) यांनी बुधवारी सकाळी एका अंतर्गत ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली.

या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका नेटफ्लिक्सच्या प्रॉडक्ट, टेक्नॉलॉजी, लीगल (कायदेशीर) आणि एचआर (HR) विभागांना बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक मंदीचे सावट आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने खर्च कमी करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Amravati Teacher Constituency Election : महायुतीत बंडखोरी, मविआत फूट; २६ उमेदवारांमुळे चुरशीची लढत
राजरत्न मोटघरे

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची आणि रंजक बनली आहे. शैक्षणिक संघटनांचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात राजकीय पक्षांची थेट एन्ट्री झाल्यामुळे समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यातच महायुतीमधील बंडखोरी आणि महाविकास आघाडीतील (मविआ) फूट यामुळे निवडणुकीची लढत बहुरंगी आणि अनिश्चिततेकडे झुकताना दिसत आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा शिवसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यासाठी यंदाची वाट अत्यंत काटेरी ठरत आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून तिकीट न मिळाल्यामुळे गत निवडणुकीचे प्रतिस्पर्धी तथा शिक्षक आघाडीचे माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असताना हा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्यात आला. त्यामुळे भाजपच्या संगीता शिंदे, शेखर भोयर आणि डॉ. सुमित पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परिणामी, महायुतीची मते विभागली जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीत फूट

समन्वयाच्या अभावाचा फटका महाविकास आघाडीलाही बसला असून, येथेही मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) कडून दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसने प्रा. आदिती पोहरे (माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या) यांना मैदानात उतरवले आहे. प्रा. आदिती पोहरे यांच्या पाठीशी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा प्रभाव आणि एकगठ्ठा मतदार असल्याचे सांगितले जात असले, तरी मविआतील अंतर्गत फुटीमुळे सत्ताविरोधी मते एकत्र येण्याऐवजी विभागली जाण्याची दाट शक्यता आहे.

बंडखोरी रोखण्यासाठी महायुतीच्या हालचाली

बंडखोरी रोखण्यासाठी आता महायुतीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अमरावती येथील एका बैठकीत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि आमदार बच्चू कडू यांनी निवडणूक रणनीती जाहीर केली. महायुतीच्या मतांची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष बैठकीमध्ये बंडखोरांची समजूत काढण्याबाबत आणि सर्व घटकांमध्ये समन्वय साधण्याबाबत अंतिम चर्चा होणार आहे.

पाच जिल्ह्यांत ३५,८१० मतदार

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होत आहे. यासाठी पात्र मतदारांची संख्या एकूण ३५,८१० इतकी आहे. यामध्ये अमरावती जिल्हा - १०,०९७, बुलढाणा जिल्हा - ९,१३४, यवतमाळ जिल्हा - ६,९३२, अकोला जिल्हा - ५,९४२ आणि वाशिम जिल्हा - ३,७१५ असे जिल्हानिहाय मतदार आहेत. यावेळी अमरावती विभागात एकूण ८१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यांची जिल्हानिहाय संख्या अमरावती - २५, बुलढाणा - १८, यवतमाळ - १८, अकोला - १३ आणि वाशिम - ७ अशी आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत पात्र ३५,६२२ शिक्षक मतदारांपैकी ३०,९१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता; मात्र मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार मतदान करताना झालेल्या चुकांमुळे १,०८९ मते बाद ठरून २९,८२९ मते वैध ठरली होती.

Ambabai Temple | लाखांवर भाविकांनी नयनी साठवले आई अंबाबाईचे रूप
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी बुधवारी चौथ्या माळेला देशभरातील विविध राज्यांतील भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या गर्दीने मंदिर प्रांगणासह आसपासचा परिसर फुलून गेला होता. या भाविकांकडून ‘आई अंबाबाईचा उदो उदो’, ‘उदं गं अंबे उदं’च्या जयघोष सुरू होता. पहाटे काकड आरतीनंतर अभिषेक विधी झाल्यानंतर दर्शन खुले करण्यात आले.

रविवारपासून घटस्थापनेनंतर श्री अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून मोठ्या संख्येने भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. पहाटेपासूनच मंदिराच्या परिसरात रांगा लागल्या. देवीच्या दर्शनानंतर प्रसाद घेण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.

ऑनलाईन दर्शनाचाही लाभ

लाईव्ह प्रक्षेपणाव्दारे ही जगभरातील अनेक भाविक श्री अंबाबाईचे दर्शन घेत आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून भाविक श्री अंबाबाईचे दर्शन घेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यातून देवीचे फोटो तसेच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्याचबरोबर प्रसादाचे लाडू, निर्माल्यापासून तयार करण्यात आलेली अगरबत्ती, देवीचे फोटो, कुंकू आदी वस्तू भाविक आपल्या घरी घेऊन जात आहेत.

ललितसहस्रनामासह भावगीतांची पर्वणी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रौत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. यामध्ये बुधवारी ‘ललितसहस्रनाम’ने सुरुवात झाली, तर त्यानंतर जगदीश गुळवणी यांनी ‘श्रीसुक्त’ पठण केले. त्यानंतर श्री करवीर निवासिनी महिला भजनी मंडळ, दुर्गा माता भजनी मंडळ, श्री लक्ष्मी नृसिंह भजनी मंडळ इचलकरंजी, गजानन महाराज भजनी मंडळ आणि श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ कावळा नाका, कोल्हापूर यांचे भजनाचे कार्यक्रम झाले.

दर्शनरांगेत स्टीलचे बेंच

नवरात्रौत्सवात दर्शनासाठी किमान चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने वयोवृद्ध भाविक तसेच लहान मुलांसोबत असलेल्या महिला भाविकांची गैरसोय होत होती. बुधवारपासून मुख्य दर्शनरांगेत देवस्थान समितीच्या वतीने काही ठिकाणी स्टीलचे बेंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबद्दल भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Yavatmal Crime : यवतमाळ हादरले! दारूसाठी पैसे नाकारल्याने मुलाकडून बापाचा खून; आरोपी जेरबंद
यवतमाळ : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून झालेल्या वादात मुलाने जन्मदात्या वडिलांवर लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घाटंजी तालुक्यातील साखरा येथे बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

शंकर नंदू जाधव (वय ५५, रा. साखरा) असे मृताचे नाव असून, अनिल शंकर जाधव (वय ३५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. दारू पिण्यासाठी अनिलने वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात अनिलने लाकडी दांड्याने वडिलांवर सपासप वार केले. या हल्ल्यात शंकर जाधव गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर शंकर जाधव यांना त्यांच्या मोठ्या मुलाने तातडीने उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी बुधवारी (दि. १३ ऑक्टोबर) विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा अनिल जाधव याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.

Beed | पैसे नसल्याने रुग्णवाहिका नाकारली; उपचारासाठी लेकीला खांद्यावरून नेण्‍याची बापावर वेळ!
बीड :  आजारी असलेल्या चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतरही पैशांअभावी शासकीय रुग्णवाहिका नाकारल्याचा धक्कादायक प्रकार माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आला आहे. डिझेलसाठी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर रुग्णवाहिकेतून उतरवण्यात आल्याचा आरोप संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यातच, 'चार मुलांचा सांभाळ होत नसेल, तर चार लेकरं कशाला पैदा केली?' असे डॉक्टरांनी म्हटल्याचा व्हिडीओदेखील समोर आला. अखेर मुलीला खांद्यावर घेऊन तिच्या वडिलांना रुग्णालयाबाहेर पडावे लागले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्हाभरातून संताप व्यक्त होत असून, संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी होत आहे.

दि. २९ सप्टेंबर रोजी दिंद्रूड येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीत शिकणार्‍या ११ वर्षीय मुलीला सकाळी सुमारे ११ वाजता अचानक फीट आली आणि ती बेशुद्ध पडली. मुलीची प्रकृती पाहून मुख्याध्यापक मनोहर कटारे आणि शिक्षकांनी तिला तातडीने दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश ढाकणे यांनी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात नेण्यास सांगितल्याचे समजते. मुलीला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता तिच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेचा आधार घेतला. मात्र, रुग्णवाहिकेतील डिझेलसाठी पैसे मागण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर बेशुद्ध मुलगी आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परिस्थितीने अगोदरच हतबल झालेल्या वडिलांसमोर आता लेकीला घेऊन पुढे काय करायचे, असा गंभीर प्रश्न उभा राहिला.

याचवेळी डॉक्टरांनी केलेल्या कथित वक्तव्याने कुटुंबीयांच्या वेदनेत आणखी भर पडली. 'आमच्याकडे खायलाच पैसे नाहीत, तर डिझेलसाठी पैसे कुठून आणायचे? आम्ही कष्ट करून चार लेकरांचा सांभाळ करतो,' अशी व्यथा कुटुंबीयांनी मांडल्याचे सांगण्यात येते. त्यावर डॉक्टरांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आईचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कष्टावर चालतो. मुलीला वारंवार फीट येत असल्याचे तिच्या आजीने सांगितले. 'आम्ही कष्ट करून मुलांना खाऊ घालतो. रुग्णालयात घेऊन गेलो; पण पैसे नसल्याने रुग्णवाहिका मिळाली नाही. डिझेलचे पैसे कुठून आणायचे?' असा सवाल करत आजीने आपली व्यथा मांडली.

आरोग्य राज्यमंत्र्यांनी घेतली दखल

या प्रकरणाची दखल राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली आहे. संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. डॉ. ढाकणे यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार तातडीने काढून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदींनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्याकडे उपसंचालक, आरोग्य सेवा, परिमंडळ लातूर यांच्यामार्फत सादर करण्यात आला आहे. शासनस्तरावरून पुढील आदेश होईपर्यंत ढाकणे यांचे मुख्यालय बीड जिल्‍हा परिषद राहणार आहे.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये गोळीबार! कथित पत्रकार हरेश गजवानी यांची हत्या, अविनाश नायडूवर हत्येचा आरोप
उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील लालचक्की रस्त्यावर रिक्षा रांगेजवळ गोळीबार करून हरेश गजवानी ऊर्फ शहाणी यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अविनाश नायडू याने हरेश गजवानी यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. डोक्यात दोन गोळ्या लागल्याने हरेश यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रावर गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या पथकानेही तात्काळ घटनास्थळी दाखल होत समांतर तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान, या हत्येला चार वर्षांपूर्वीच्या एका हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे. चार वर्षांपूर्वी संशयित आरोपी अविनाश नायडू याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्या प्रकरणात हरेश गजवानी हा आरोपी होता. त्यामुळे हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडला आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. या गोळीबारामागील नेमके कारण, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि आरोपीचा शोध याबाबत अधिकृत माहिती पोलिसांच्या सखोल तपासानंतरच समोर येईल.