Responsive image

पहिला चहा : टाळूवरचे लोणी!

By arun.patil | Publish Date: May 24 2020 8:00PM

प्रा. दिनेश डांगे

दिल्‍ली देशाची राजधानी; पण आम्हा मजुरांसाठी ठरली ती जीवघेणी! कुणाला लुटावे आणि किती किती लुटावे याला काही धरबंधच नाही तेथे. अरे बँका लुटता, रस्ते, पूल गायब करता इथंपर्यंत ठीक आहे. मात्र, आम्हा मजुरांनाही लुटायचे म्हणजे हद्दच झाली. अधीच कोरोनाने आमचा कामधंदा, रोजीरोटी, निवारा हिरावून घेतला. आम्ही काही तक्रार केली? का आम्ही तुमच्याकडे काही मागितले? लॉकडाऊनमध्ये तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहिलात. आम्हाला घरच नाही म्हटल्यावर आम्ही उघड्यावरच राहिलो. तरीही किती दिवस आम्ही उघड्यावर राहणार? तुम्ही हाकलून लावण्याऐवजी आम्हीच दिल्‍ली सोडून निघालो. उन्हातानात बायका पोरांसह डांबरीवरून चालत निघालो; पण तुम्ही गिधाडासारखे आमच्या डोक्यावर घिरट्या घालत होता. आमच्या कनवटीचे पैसे लुबाडण्याचा तुम्ही बेत आखला. एजंट पाठविले तुम्ही आमच्याकडे! अमूक-अमूक पैसे द्या आम्ही तुम्हाला बसने पाठवितो तुमच्या गावाकडे म्हणालात. बायका, पोरं खूश झाली. चालत जाऊन वाटेत मरून पडण्यापेक्षा आरामात बसमध्ये बसून भुर्रकन गावाकडे जाऊ या कल्पनेने त्यांना कोण आनंद झाला! आम्हीपण कुटुंबाच्या सुखासाठी कनवटीला राहिले सवरलेले पैसे तुमच्या हवाली केले; पण लांडगे आणि तरस तुमच्यापेक्षा बरे! त्यांनासुद्धा जरा दया येईल! पण गिधाडांनो तुम्ही बस पाठवितो म्हणून आमचे पैसे लंपास करून जे फरार झाला ते तिकडेच! आता आमच्याजवळ काय शिल्‍लक राहिले आहे हिरावून घेण्यासारखे? जाता जाता आमचे प्राण तरी न्यायचे? अरे फसवताना तुम्ही कुणाला फसवता हे तरी ध्यानात घ्यायला हवे होते? देशाची राजधानी म्हणायची का हिला ठकसेनांची राजधानी म्हणायची? सरकार तरी बिचारे कुठं कुठं बघणार? ते म्हणणार तुम्हाला पैसे कुणी द्यायला सांगितले होते? जरा दम धरता येत नव्हता का? आम्ही तुम्हाला रेल्वेने सोडले असते तर बिस्किटचा पुडा आणि बिसलरीची बाटलीही दिली असती. आता आम्हाला सरकारचीच दया येतेय. आमची सेवा करण्याची संधी आम्ही सरकारला देऊ शकलो नाही, याची खंत वाटते आम्हाला! आम्ही आता मेलो तर आमच्या टाळूवर लोणीच आता शिल्‍लक राहणार नाही. भिऊ नको मात्र. कारण, आमचा तुम्हाला श्राप कधीच लागणार नाही. कारण, जरूर आम्ही मागच्या जन्मी खूप पाप केले असणार. त्याचा हिशेब आता आम्ही चुकवीत आहोत. तुम्ही मात्र मागच्या जन्मी पुण्य भरपूर कमविले असणार. त्यामुळे तर तुम्ही या जन्मी गिधाडे झालात. मजुरांच्या कनवटीचे उरले सुरले पैसेसुद्धा तुम्ही लंपास केले.

'टोमॅटो एफएम'च्या 'फॅनक्लब काँटेस्ट'मध्ये सहभागी व्हा आणि बक्षिसं जिंका!


औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या गाडीवर दगडफेक


उस्मानाबाद : ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने माजी सैनिकांचा जागीच मृत्यू


मानसी नाईक अडकली लग्नबंधनात!


अन् अजिंक्य रहाणेने वर्णद्वेषी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचीही मने जिंकली


राज्यातील सरपंचदाचा निर्णय 'या' महिन्यात होणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ


बीसीसीआयकडून टीम इंडियाला ५ कोटी रूपयांचे विशेष गिफ्ट


'यही पुछता है भारत'; रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा


कोरोना लसीकरण : भारत बायोटेक साइड इफेक्टबद्दल सांगते, 'रोग प्रतिकारशक्तीच्या समस्या असणाऱ्यांनी कोव्हॅक्सिन घेऊ नये'


राज्यात ’या' दिग्गज नेत्यांचे बालेकिल्‍ले ढासळले, तर 'या' नेत्यांनी गड राखण्यात यश मिळवले