Sun, Feb 23, 2020 03:40होमपेज › Soneri › आमिरला द्रौपदी म्‍हणून 'ही' हवीय अभिनेत्री

महाभारतात आमिरला द्रौपदी म्‍हणून 'ही' हवीय अभिनेत्री

Published On: | Last Updated:
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सध्‍या त्‍याचा आगामी चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्‍या शूटिंगमध्‍ये बिझी आहे. आमिर खानने पहिल्‍यांदाच त्‍याच्‍या ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’बद्‍दल इच्‍छा जाहीर केलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने अखेर 'महाभारत'साठी स्‍टारकास्‍टचा शोध सुरू आहे. 'महाभारत'मध्‍ये द्रौपदीची भूमिका दीपिका पादुकोणने करावी, असं आमिर खानला वाटतय. 

Related image

‘महाभारत’ आमिर खानची आणि देशातील पहिलाच सर्वांत महागडा चित्रपट असणार आहे. आमिर खानचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. दीपिकाचा आवाज ऐतिहासिक भूमिकेसाठी परफेक्‍ट आहे. तिच्‍याकडे काम करण्‍याचा उत्‍साह आणि ती मेहनती देखील आहे. त्‍यामुळे महाभारत मध्‍ये दीपिकाने द्रौपदीची भूमिका करावी, असे आमिर खानला वाटत आहे. पण, सूत्रांच्‍या माहितीनुसार, ‘पद्मावत’नंतर दीपिका पादुकोण आणखी एक महाकाव्य चित्रपट करायचा की नाही या विचारत आहे. कारण, असे ऐतिहासिक चित्रपट वादग्रस्‍त ठरू शकतात. आमिर खानच्‍या एका मित्राने याविषयी बोलताना सांगितले होते की, द्रौपदीची भूमिका दीपिका पादुकोणशिवाय इतर कोणी करू शकत नाही. 

Related image
महाभारत चित्रपटाचं बजेट जवळपास १००० कोटी रूपये सांगितलं जात आहे. 'मला या चित्रपटात काम करायला देखील भीती वाटत आहे,' असे आमिर प्रसारमाध्‍यमांशी बोलताना सांगितले. दरम्‍यान, आमिर खानने या चित्रपटात भगवान कृष्णाची भूमिका करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती.