Thu, Dec 13, 2018 23:08होमपेज › Youthworld › व्हॉट्सअप अपडेट; आता डिलीट फाईल्स डाऊनलोड करता येणार

व्हॉट्सअप अपडेट; आता डिलीट फाईल्स डाऊनलोड करता येणार

Published On: Apr 16 2018 6:25PM | Last Updated: Apr 16 2018 6:25PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

व्हॉट्सअपवर दिवसभरात अनेक फोटो आणि व्हिडिओ येत असतात. या फाईल्समुळे तुमचा मोबाईल हँग होतो म्हणून तुम्ही फाईल्स डिलीट करत असाल. पण, काही महत्वाचे फोटोही डिलीट झाले तर तुम्ही संबंधित व्यक्तीला ते पुन्हा पाठवावे लागतात. पण, अशावेळी घाबरून जायची गरज नाही. कारण आता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमधून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ पुन्हा मिळवता येणार आहेत.

डिलीट केलेले फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल्स २ महिन्यांपर्यंत परत मिळवण्याची सुविधा व्हॉट्सअपने आणली आहे. डिलीट केल्यानंतर २ महिन्यांपर्यंत तुम्ही त्या फाईल्स पुन्हा डाऊनलोड करू शकता. 

व्हॉट्सअपचे जूने सर्व्हर तुमच्या मिडिया फाईल्स १ महिन्यापर्यंत सांभाळून ठेवत होते. पण, काही दिवसांपासून व्हॉट्सअप या फाईल्स सेव्ह करून ठेवत नव्हते.आता पुन्हा एकदा व्हॉट्सअपने ही सुविधा सुरू केली आहे. ॲन्ड्रॉईड स्मार्टफोनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी व्हॉट्सअपचे नवे व्हर्जन तुम्हाला अपडेट करावे लागेल. व्हॉट्सअपचे अपडेटेट व्हर्जन (2.18.113) लॉन्च झाले आहे. 

कसे करायचे डाऊनलोड ?

yes पाठवलेली अथवा आलेली फाईल पाहण्यासाठी युजर चॅटमध्ये जा

yes युजरच्या नावावर क्लिक करा

yes फोन मीडिया ऑप्शन ओपन करा

yes त्यामध्ये एकमेकांना पाठवलेली अथवा तुम्हला आलेल्या सर्व फाईल्स एकत्रित दिसतील.

yes या सर्व फाईल्समधून तुम्ही डिलीट केलेली व आता हवी असणारी फाईल डाऊनलोड करू शकता
 

Tags : Whats Up, Update, 2.18.113 version, Download, Delete Files