Fri, Nov 24, 2017 20:17होमपेज › Youthworld › viral video: पडली ती आर्ची नाही!

viral video: पडली ती आर्ची नाही!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘सैराट’ सिनेमामधून घराघरात पोहोचलेल्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे रिंकू पुन्हा चर्चेत आली आहे. 

एका नदी काठी एका सिनेमाच्या गाण्याचे शुटींग सुरू होते. यामध्ये अभिनेत्री एका गाण्यावर नाचत आहे. जमीन ओली असल्यामुळे अभिनेत्रीचा तोल जातो आणि ती पडते. या व्हिडिओमध्ये विशेष असे आहे की, त्यातील अभिनेत्री हुबेहुब रिंकू सारखी दिसते. 

‘आर्ची पडली रे.....’ अशा आशयासह हा व्हिडिओ व्हायरल होत होता. ‘सैराट’चा कन्नड रिमेक चित्रपटाचे नाव ‘मनसु मल्लिगे’ असे होते यामुळे अनेकांना असेच वाटले की याच सिनेमातील हा शॉट आहे. या व्हिडिओचे वास्तव तपासले तेव्हा असे लक्षात आले की या व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री रिंकू नसून भलतीच कोणीतरी आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा रिंकूच्या वडिलांनी ‘ती रिंकू नव्हेच’ असे स्पष्ट केले होते. 

 

 

व्हिडिओमध्ये दिसणारी अभिनेत्री ही मल्याळम असून तिचे नाव लिंडा कुमार असे आहे. एका सिनेमाच्या शुटींगवेळी तिच्यासोबत अशी घटना घडली होती. या गाण्याच्या तयारीचा व्हिडिओमध्ये ती रिंकू नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.