Sat, Mar 23, 2019 00:19होमपेज › Youthworld › आनंदी राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा...

आनंदी राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा..

Published On: Jul 12 2018 5:35PM | Last Updated: Jul 12 2018 5:55PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मनुष्‍याचे सध्याच जीवन हे इंटरनेट सारखं सुरू आहे. इंटरनेटला कधी रेंज नसते तर कधी फुल रेंज असते, अगदी तसचं आपल जीवन झाले आहे. कधी आपण आनंदी असतो तरी कधी दुःखी. 'सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे' संत तुकारामांनी म्हटंल्याप्रमाणे  माणसाच्या जीवनात चढउतार होत असतो. आपण सुखाच्या जगात नेहमीच बागडत असतो. मात्र दुःखाचे संकट ओढावताच आपले चेहरा पडतो, मनाचे खच्चीकरण करून आपण निराशेच्या जाळ्यात ओढले जातो. पण अशा गोष्टी वर मात करण्यासाठी काही टिप्स.... या वाचल्‍यानंतर तुम्‍ही दुख विसरुन आनंदी जीजन जगाण्‍याचा मार्ग निवडणार हे मात्र नक्‍की...

smileyमनातील गोष्ट कागदावर उतरवा..

Related image

आपण नेहमीच मनातल्या गोष्टी व्यक्त करत नसतो. काहींचा सभाव बोलका असुनही प्रत्येक वेळेस सगळ्याच गोष्टी सोबतीला सांगणे योग्य नसते,  याच कारणास्तव आपण अनेक गोष्टी आपल्या मनात साचवुन ठेवत असतो. तर काहींचा स्वभाव हा अबोल असतो. पण आपल्या या अशा सवयींचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो. त्यामुळे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्यात नकारत्मकतेची भावना होत असते अशा गोष्टी कागदावर उतरावा.  मनाला होणारा सगळा त्रास आणि ताण क्षणात दुर होईल. कागदावर लिहून काढल्यास सकरात्मकतेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच प्रत्येक संकटाला सामना करण्याचा आत्मविश्वासदेखील निर्माण होत असतो. 

smileyकाम करत राहा...

Image result for work

जेव्हा तुम्ही दुःखी आणि तुमचे मन निराश होते, त्यावेळेस तुमचे आवडीच काम करा. आवडीचे काम केल्याने दुःख किंवा निराशाची भावना दुर होण्यास मदत होते. आपल्या आवडीच्या कामात गुंतल्याने मनातील त्रासाचा विसर पडतो. त्यामुळे आपले मन उत्साही बनण्यास मदत होते. आवडाने काम केल्याने  हाती घेतलेले कामदेखील चांगले होते. यासाठी कामात रहा आणि दुखापासू लांब रहा.

smileyगुंतुन राहा..

Related image

मूड खराब झाल्यास त्यावरील सर्वात चांगला उपाय म्हणजे साफसफाई करणे होय. साफ सफाईच्या कामात गुरफटल्याने आपल्याला वाईट गोष्टींचा विसर पडतो.  तसेच आवडीचे गाणी लावा. कारण आपल्या आवडीच्या गाण्यात आपणही गुतंतो आणि गाण्यांच्या उच्चारासोबत आपले मनही बागडत असते. 

smileyयोगा करा..

Image result for help

मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेत गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताण तणावातून मुक्त होऊ शकतो आणि मनाला शांत करू शकतो. योग आणि प्राणायामांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे धावणाऱ्या मनाला आपण सतत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते. 

smiley​​​​​​​​​​​​​​इतरांना मदत करा..

Related image

आपल्याला खरा आनंद कधी होतो तर एखाद्या व्यक्तीला मदत केल्याने. ज्या व्यक्तीला आपण मदत करतो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून खरा आनंद होत असतो. कारण मदत केल्याने आपल्या मनाला शांती आणि समाधान मिळत असते. त्यावेळे आपण दुःखाची पाठ कधी सोडतो हेच समजत नाही. 
वरील गोष्‍टी आपणास दु:खातून बाहेर काढण्‍यास मदत करतील. आजच्‍या धावपळीच्‍या जगात आपण आपला आनंद विसरत चाललो आहे. निरोगी राहण्‍यासाठी  आनंदी राहण्‍याची गरज आहे. आनंदी रहा, आनंदी जीवन जगा.