गणपती बाप्पाला या ५ गोष्टी खूप आवडतात, पूजेच्या वेळी नक्की ठेवा

Published On: Aug 31 2019 1:11PM | Last Updated: Aug 31 2019 1:00PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


मुंबई: पुढारी ऑनलाईन

सध्या सगळीकडे धूम आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. सगळीकडे लगबग सुरू आहे. सगळेच गणपती उत्सवात घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधत असतो. कधी कधी आपण सहजपणे उपलब्ध असलेले पर्याय खरेदी करतो आणि कधी कधी आपल्याला नवीन निर्मिती व आपल्या मनाप्रमाणे काहीतरी वेगळी सजावट करावीशी वाटते. या सर्व गोंधळात बाप्पाच्या आवडीच्या वस्तू नकळत विसरतो. पण पूजेच्या वेळी त्याच्यासमोर त्याच्या आवडीच्या वस्तु ठेवायला नक्की विसरू नका.

आपल्या लाडक्या गणेशाला लंबोदर असं म्हटलं जातं आणि बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे बाप्पाला खुश करण्यासाठी पूजेच्या वेळी बाप्पासमोर मोदक ठेवायला विसरू नका.

Related image

मंडळी पूजा म्हटलं की सगळ्यात आधी येतात ती म्हणजे फुलं. पण फुलांपेक्षाही गणपती बाप्पाला दुर्वा सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळे पूजेच्या वेळी दुर्वा ठेवायला विसरू नका.

Image result for lord ganesha with durva

फुलांमध्ये गणेशाला जास्वंदाचं फुलं खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला जास्वंदाचं फुलं वाहू शकता.

Image result for lord ganesha with jaswand ful

आता विषय आला फळांचा. तर आपण प्रत्येक पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून  केळी  ठेवतो. तशी ती केळी आपल्या बाप्पालाही आवडतात. पण लक्षात असू द्या की एकेक केळ्याचा नैवेद्य बाप्पाला देण्यापेक्षा केळ्याचा घड ठेवलेला कधीही योग्य.