Thu, Jun 04, 2020 20:47होमपेज › Youthworld › कविता : वैद्यक सार

कविता : वैद्यक सार

Last Updated: Apr 09 2020 3:26PM
कोरोना रुग्णांच्यावर अत्यंत संयमाने डॉक्टर उपचार करत आहेत. असे रुग्ण हाताळणे धोकादायक तसेच जिकीरीचे काम आहे. मात्र कर्तव्य भावनेने डॉक्टर हे काम अत्यंत सचोटीने करत आहेत. औरंगाबादच्या त्यातीलच एका डॉक्टरने काव्यातून आपल्या वैद्यकीय व्यवसायाचे तसेच शिक्षणाचे गमक उलगडले आहे. त्यांची ही कविता. खास पुढारीच्या वाचकांसाठी...

अस्तित्व ज्ञात होम हवनांचे 
बोलके उदाहरण कवित्वाचे 
चारदिशी वर्तावी तुझी महती 
सार्थ जगी काव्योपचार पद्धती
प्राचीन काळी इजिप्त जमाती 
शब्द कविता पेयजली पाजती 
रोमन वैद्यकतज्ञ सोरानसने 
दिधले उपचार काव्यलेखने
अमेरिकी स्थापली बिब्लीओथेरपी 
साहित्यिक उपचार बेंजामीनप्रती 
राबविली जागोजागी काव्यमोहीम 
ग्राईफरने आयुष्य वेचून अप्रतिम 
सुखदुःखातून तुझी निर्मिती 
निकोप मानसिक वृद्धी दात्री 
दाटलेला तीव्र भावनिक निचरा 
काव्यरूप त्यातून येई आकारा ...

- डॉ. अर्चना पाटील 
(अबोली)