होमपेज › Youthworld › ‘माझ्या नवऱ्याची बायको' या साँगवर थिरकल्या मस्तानी आणि काशीबाई(Video)

‘माझ्या नवऱ्याची बायको' या साँगवर थिरकल्या मस्तानी आणि काशीबाई(Video)

Published On: Sep 14 2018 1:25PM | Last Updated: Sep 14 2018 1:25PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सध्याच्या घडीला नेटकरी सोशल मीडियावर काय करतील याचा काही थांगपत्ता लागणार नाही. कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळंण भलतच झाल आहे. सध्या बॉलिवूडच्या गाण्यांना इंग्रजी किंवा मराठी टच देण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. असाच एक प्रियांका आणि दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' हे ऐकताच नजरेसमोर येते ती राधिका, शनाया. या दोघींनी साकारलेली पात्रांची भुमिका 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मस्तानी आणि काशीबाई यांच्या भुमिकेला जोड देत गमंतीशीर व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. 

'मनोज शिंगस्टे एडिटींग' नावाच्या युट्यूब चॅनलवर या मालिकेच्या टायटल साँगचा वापर करुन एक मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनी तयार केला आहे. याला 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' गाणे जोडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.