लसूण सोलण्याचा रामबाण उपाय(Video)

Published On: Jun 18 2019 2:30PM | Last Updated: Jun 18 2019 1:51PM
Responsive image


नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

लसूण सोलणं ही मोठी डोकेदुखी असते. हे सर्वांनाच माहिती आहे. नेहमीच्या वापरातील लसूण सोलणं म्हणजे गृहिणींसाठी कंटाळवाणं काम असतं. यासोबतच लसुण सोलण्यापूर्वी प्रत्येकजण आपल्या बोटांची आणि नखांची काळजी घेत असतो.  हे कंटाळवाणं काम चुटकीसरशी करण्याची अनोखी युक्ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

लसूण हा जेवणातील मुख्य घटक. अनेक पदार्थात लसूण लागतोच. लसूण सोलण्यासाठी एक रामबाण उपायाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कटरसारख्या एका अणकुचीदार वस्तूने पटापट लसूण कसे सोलता येतं हे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ही प्रक्रियासुद्धा तशी काही क्लिष्ट नाही. ती अणकुचीदार वस्तू लसणाच्या पाकळीत घुसवून हाताच्या साहाय्याने सालीपासून लसूण  पाकळी वेगळा करण्यात येत आहे. अत्यंत साधी सोपी पद्धत पाहून नेटकऱ्यांचा भुवया उंचावल्या आहेत. 

सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अशा युक्त्या समजून घेण्यासाठी इंटरनेटचा योग्य वापर होतो अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे. तर काहींनी इतक्या सहजतेने लसूण कसा सोलता येतो यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी तर यावर मीम्ससुद्धा शेअर केले आहेत.