Wed, Nov 14, 2018 12:15होमपेज › Youthworld › येथे बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल

येथे बॉयफ्रेंड भाड्याने मिळेल

Published On: Feb 13 2018 6:00PM | Last Updated: Feb 13 2018 6:09PM नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन
 

प्रेमासाठी कायपण! हे दोन शब्द आजच्या तरुणाईसाठी अगदी वजनदार वाटतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रेम या अडीच अक्षरी शब्दाला अधिक फुलवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या प्रिय व्यक्तिला झुलवण्यासाठी म्हणा या शब्दांचा सर्रास वापर होतो. एवढेच नाही तर, तरुणाईला हा शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतो. पण ज्याच्या आयुष्यात प्रिय व्यक्तीच नाही त्याने प्रेमाचा हा दिवस कसा साजरा करायचा? असा प्रश्न पडलेल्या एका अवलियाने एक भन्नाट पोस्ट शेअर करुन जोडीदार नसणाऱ्या तरुणींसमोर हटके अंदाजात एक नाट्याळ प्रस्ताव ठेवलाय.  व्हॅलेंटाइन्सच्या मुहूर्तावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.  

दिल्लीतील तरुणाने चक्क व्हॅलेंटाइन्स डे दिवशी तात्पुरत्या अर्थात भाडेतत्वावर प्रियकर बनण्याची तयारी दाखवली आहे.  गुडगावमधील शकुल गुप्ता नावाच्या तरुणाने VALENTINE'S DAY BOYFRIEND RENTAL या शीर्षकाखाली एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. कहर म्हणजे शकुलने पॅकेजची शक्कलही लढवली आहे. त्याने फेसबुक पोस्टवर मुलींना डिस्काउंट ऑफरची देखील सुविधा असल्याचे म्हटले आहे. शिवाय ऑडीकारमधून राईड देणार असल्याचा उल्लेख केला आहे. तरुणीला हातात हात घेण्याचे आश्वासन देताना त्याने झुरळापासून मदत करणार नाही, असेही स्पष्ट सांगितले आहे.  

शकुलने असाही दावा केलाय की, मागील वर्षी त्याला पाच तरुणींनी डेटिंगसाठी निवडले होते. त्या सर्व तुरुणींनी एकत्रितपणे त्याला ऑबेरॉयमध्ये जेवणाची मेजवाणी दिली. याशिवाय 'आयफोन ७' गिफ्ट दिला होता. त्याच्या या दाव्यात किती खरे आहे तोच जाणे, पण त्याचीही पोस्ट ३ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी शेअर केली आहे.