Thu, Sep 21, 2017 23:22होमपेज › Youthworld › ऐकलत का? आयफोनच्या किमती कमी झाल्या

भारतात  आयफोन स्वस्त!

Published On: Sep 13 2017 2:47PM | Last Updated: Sep 13 2017 2:47PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

ॲपलचा बहुप्रतिक्षित 'आयफोन ८', 'आयफोन ८ प्लस' आणि 'आयफोन  एक्स' मंगळवारी रात्री लॉन्च झाला. या पाठोपाठ ॲपलने 'आयफोन ६ एस', 'आयफोन ६ एस प्लस', 'आयफोन ७' आणि 'आयफोन ७ प्लस'च्या किमती कमी केल्या आहेत. 

'आयफोन'च्या किमती कमी होतील याची वाट पाहणाऱ्या युझर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे. 'आयफोन ८' लॉन्च होणार आहे या पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन युझर्स ॲपलकडून होणाऱ्या या घोषणेची वाट पाहत होते. 

गेल्यावर्षी देखील ॲपलने 'आयफोन ७' लॉन्च केल्यानंतर 'आयफोन ६ एस' आणि 'आयफोन ६एस प्लस'ची किमत कमी केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात ॲपलने सर्व आयफोनच्या किमती ४ ते ७.५ टक्क्यांनी कमी केल्या होत्या. विशेष म्हणजे ही कपात जीएसटी लागू झालेल्या दिवशी करण्यात आली होती. 

सध्या सर्व आयफोन ६४ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहेत. 'आयफोन ८' व 'आयफोन ८ प्लस' हे दोन्ही फोन २९ सप्टेंबरनंतर भारतात उपलब्ध होतील. त्याची किमत अनुक्रमे ६४ हजार आणि ७३ हजार अशी ठेवण्यात आली आहे. तर ॲपलला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने लॉन्च करण्यात आलेला 'आयफोन एक्स' ८९ हजार रुपयांना मिळणार आहे. अर्थात हा फोन भारतात ३ नोव्हेंबरनंतर उपलब्ध होणार आहे. त्याचे प्री-बुकिंग २७ ऑक्टोबर नंतर सुरु होईल. 

अशा आहेत आयफोनच्या नव्या किमती 

आयफोन ७ प्लस (३२ जीबी)
नवी किंमत- ५९ हजार 
जुनी किंमत- ६७ हजार ३००
---
आयफोन ७ प्लस (१२८ जीबी)
नवी किंमत- ६८ हजार 
जुनी किंमत- ७६ हजार २००

000
आयफोन ७ (३२ जीबी)
नवी किंमत- ४९ हजार 
जुनी किंमत- ५६ हजार २००
---
आयफोन ७ (१२८ जीबी)
नवी किंमत- ५८ हजार 
जुनी किंमत- ६५ हजार २००
000
आयफोन ६एस प्लस (३२ जीबी)
नवी किंमत- ४९ हजार 
जुनी किंमत- ५६ हजार १००
---
आयफोन ६एस प्लस (१२८ जीबी)
नवी किंमत- ५८ हजार 
जुनी किंमत- ६५ हजार 
000
आयफोन ६एस  (३२ जीबी)
नवी किंमत- ४० हजार 
जुनी किंमत- ४६ हजार ९००
---
आयफोन ६एस  (१२८ जीबी)
नवी किंमत- ४९ हजार 
जुनी किंमत- ५५ हजार ९००