Fri, Nov 24, 2017 20:10होमपेज › Vishwasanchar › मुंबईत चौळ्यांचा झाला जन्म!

मुंबईत चौळ्यांचा झाला जन्म!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : जुळ्यांचा जन्म झाला तरी आपल्याला ही बाब विशेष वाटत असते. अशा वेळी तिळे किंवा चौळे जन्माला येणे ही खासच बाब ठरते. मुंबईतील एका दाम्पत्याला आता अपत्यप्राप्तीचा ‘चौपट आनंद’ झाला आहे. जे. जे. रुग्णालयात एका महिलेने एकाचवेळी एक, दोन नव्हे तर चार बाळांना जन्म दिला आहे. जहानरा शेख या 29 वर्षाच्या महिलेचे नाव आहे. जहानरा नाशिकची असून गेल्या पाच महिन्यांपासून उपचारासाठी जे. जे. मध्ये येत होती. 

जहानरा शेखने 7 ऑगस्टला एक मुलगा व तीन मुलींना जन्म दिला. ती नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर उपचार घेत होती. डॉक्टरांनी जहानराची तपासणी व उपचार केले असून बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याचे सांगितले आहे. त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाचवेळी चार मुलांना जन्म देण्याची मुंबईतील गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.