Fri, Nov 24, 2017 20:10होमपेज › Vishwasanchar › श्रद्धाला मिळाली प्रभासकडून ‘दावत’!

श्रद्धाला मिळाली प्रभासकडून ‘दावत’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘बाहुबली’ मुळे जगभरात नावलौकिक मिळवलेल्या प्रभासच्या ‘साहो’ या नव्या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून त्यामध्ये श्रद्धा कपूर त्याची नायिका आहे. प्रभासने श्रद्धाला सेटवर खास हैदराबादी खाद्यपदार्थांची एक मेजवानीच दिली. त्याच्या दिलखुलास स्वभाव आणि दिलदार मैत्रीवर अर्थातच श्रद्धा खूश झाली!

साहो’ चित्रपटाचे सध्या हैदराबादमध्ये चित्रीकरण सुरू आहे. श्रद्धा कपूरनेही सेटवर येण्यास सुरुवात केली आहे. प्रभासने ‘साहो’च्या सेटवर श्रद्धासाठी खास लंच प्लॅन केला होता. यामध्ये अनेक तेलगू पदार्थांचा समावेश होता. प्रभासने तिला फक्त एक, दोन नव्हे तर तब्बल पंधरा पदार्थांची ‘दावत’ दिली आहे. श्रद्धाने या लंच प्लॅनचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. शूटिंगच्या व्यस्त कामातूनही श्रद्धा तिच्या फॅन्ससाठी काही खास फोटो सोशल मीडियामधून शेअर करते. ‘साहो’च्या चित्रीकरणादरम्यानही श्रद्धाने काही निवांत क्षण शेअर केले. ‘साहो’ हा एक अ‍ॅक्शनपट आहे. या चित्रपटासाठी प्रभास मेहनत करत आहे. या चित्रपटासाठीही तो काही अ‍ॅक्शन सिन्स करणार आहे. त्यामुळे अ‍ॅक्शनसोबतच श्रद्धा आणि प्रभासची ऑन स्क्रिन केमेस्ट्री पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.