Thu, Jan 17, 2019 08:07होमपेज › Vishwasanchar › मेगनच्या लग्‍नात जाणार नाहीत तिचे वडील!

मेगनच्या लग्‍नात जाणार नाहीत तिचे वडील!

Published On: May 17 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 12:06AMलंडन :

सध्या केवळ इंग्लंडमध्येच नव्हे तर जगभर प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्केल हिच्या 19 मे रोजी होणार्‍या विवाहाची चर्चा आहे. राजकुमाराशी मुलीचे लग्‍न होत असताना वडील मात्र या शाही विवाह सोहळ्याला हजर राहणार नाहीयेत. हे ऐकल्यानंतर मेगन आणि हॅरी हे चिंतेत पडले असून त्यांनी थॉमस यांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. थॉमस मार्केल हे या लग्‍नाला हजर न राहण्यामागचं कारणही जरा विचित्र आहे.

थॉमस मार्केल यांनी लग्‍नासाठी सूट शिवायचं ठरवल्यानंतर ते माप देण्यासाठी टेलरकडे गेले होते. यावेळी माप घेतानाचे काही फोटो त्यांनी पाप्पाराझींना विकले. या छायाचित्रांची एकूण किंमत ही एक लाख डॉलर्स म्हणजे जवळपास 67 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्या या वागण्यावरून त्यांच्यावर भयंकर टीका झाली. आपण लग्‍नात गेलो, तर लग्‍नापेक्षा आपल्या या हावरटपणाचीच जास्त चर्चा होईल, अशी त्यांना आता भीती वाटायला लागली आहे. यामुळेच थॉमस यांनी या लग्‍नाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपण हृदयविकाराने आजारी असून आपल्यावर हृदयशस्त्रक्रिया होणार असल्याचेही त्यांनी कारण दिले आहे!