होमपेज › Vishwasanchar › हे आश्चर्यकारक लँडिंग पाहिले का?(Video)

हे आश्चर्यकारक लँडिंग पाहिले का?(Video)

Published On: Jan 11 2019 6:39PM | Last Updated: Jan 11 2019 6:40PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

अनेकवेळा विमानाच्या तांत्रिक बिघाड झाला असता प्रवशांच्या बचावासाठी तत्परतेने वैमानिक विमान पाण्यात लँडिग केल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण एका वैमानिकाने पर्वतावर अडकलेल्या व्यक्तीसाठी नामी शक्कल लढवली. त्याने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पुढच्या टोकावर लँडिग केले. त्याच्या या आर्श्चकारक लँडिगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हयरल होत आहे. 

पूर्व फ्रान्समधील आल्प्स पर्वतावर १९ वर्षाचा ट्रेकर जखमी झाला. ती माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्याला वाचवण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. बर्फाळ डोंगरावर पोहचताच वैमानिकाने जखमी ट्रेकरला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर पुढच्या टोकावर लँडिग केले. 

आल्प्स पर्वत ७.४०० पार केल्यानंतर एका अनुभवी ट्रेकरच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यावेळी गाईडने मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला.