Fri, Nov 24, 2017 20:14होमपेज › Vishwasanchar › अंबानींच्या ‘अँटिलिया’तील कचरा जातो कुठे?

अंबानींच्या ‘अँटिलिया’तील कचरा व्हायरल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई: पुढारी ऑनलाईन

भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या घराबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी या घरातील फोटो व्हायरल होतात तर कधी नोकरांची संख्या 600 असल्याची बातमी येते. याच घरातील कचऱ्याबद्दल आता सर्वत्र चर्चा होत आहे. अंबानींच्या अँटिलियामधील कचऱ्याचे नेमके होत तरी काय? या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.   

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या घरात 27 मजले आहेत. या घरात 600 नोकर काम करतात. हे 600 जण या घरातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देतात. इतक्या मोठ्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे काय केले जात असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या घरातील थोडासुद्धा कचरा बाहेर टाकला जात नाही. त्या कचऱ्यापासून वीज  निर्मिती केली जाते. या विजेचा वापर त्याच घरासाठी केला जातो.

इतक्या मोठ्या घरासाठी लागणाऱ्या विजेची निर्मिती या घरातच केली जाते. वीज निर्मितीसाठी या घरात एक खास व्यवस्था तयार करण्यात आली आहे. प्रथम ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. त्यानंतर त्यापासून वीज निर्मिती केली जाते. 

‘अँटिलिया’तील काही खास गोष्टी

> या घरात 168 गाड्यांच्या पार्किंगची सोय आहे.
> घरावर तीन हेलिपॅड देखील आहेत
> घरात स्विमिंग पूल आणि स्पा रुम