हे, मला आताच झाले माहीत : सोनम

Published On: Aug 26 2019 1:52AM | Last Updated: Aug 26 2019 1:52AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


नवी दिल्ली : 

सध्या आयोडिन मीठ वापरण्याचा सर्वत्र सल्ला देण्यात येतो. मात्र, याच आयोडिनची बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या शरीरात कमतरता भासत असल्याचे समजते. शाकाहार पसंद करणार्‍या सोनमने स्वत: आपल्या शरीरात आयोडिनची कमतरता असल्याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे.

अभिनेत्री सोनमने आपल्या शाकाहारी चाहत्यांना आपल्या जेवणात आयोडिनयुक्‍त मीठ वापरण्याचा सल्लाही दिला आहे. इन्स्टाग्रामवरील संदेशात सोनमने लिहिले आहे की, सर्व शाकाहारी लोकांना माझी एक सूचना आहे. तुम्ही सर्वांनी कृपया आयोडिनयुक्‍त मिठाचाच वापर करावा. कारण मला नुकतेच समजले आहे की, माझ्या शरीरात आयोडिनची कमतरता आहे. 

सोनमचे इन्स्टाग्रामवर दोन कोटींहून जास्त फॉलोअर्स आहेत. ही अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनम नेहमीच आपले पती आणि कुटुंबातील सदस्यांबद्दलची माहिती शेअर करत असते. ‘द जोया फॅक्टर’ या आगामी चित्रपटात सोनम दिसणार आहे. हा चित्रपट लेखिका अनुजा चौहान यांच्या एका फिक्शनवर आधारित आहे. ही एका राजपूत तरुणीची कहाणी आहे. जिचे नाव जोया  असे आहे. हिंदू तरुणीचे मुस्लिम नाव असलेल्या कहाणीमध्ये कॉमेडी, इमोशन आणि भरपूर रोमान्स आहे. सोनम यापूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा ’, या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने आपले वडील अनिल कपूरसोबत अभिनय केला होता. यामध्ये राजकुमार राव आणि जुही चावला यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट म्हणावा तितका यशस्वी झाला नाही.