Tue, Jul 23, 2019 13:05होमपेज › Vishwasanchar › श्रद्धा कपूरला ‘साहो’ची प्रतीक्षा

श्रद्धा कपूरला ‘साहो’ची प्रतीक्षा

Published On: Apr 16 2019 2:12AM | Last Updated: Apr 15 2019 8:48PM
मुंबईः तेलगू सुपरस्टार प्रभासबरोबरच्या ‘साहो’ चित्रपटाची श्रद्धा कपूरला मोठीच प्रतीक्षा आहे. या चित्रपटात ‘बाहुबली’ स्टारबरोबर श्रद्धा झळकत असून हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातील एक स्टिल फोटो ऑनलाईन समोर आला असून त्यामध्ये श्रद्धा आणि प्रभासची रोमँटिक जोडी दिसत आहे.

या मल्टिस्टारर चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मुरली शर्मा, अरुण विजय, एवलिन शर्मा, चंकी पांडे, मंदिरा बेदी आणि महेश मांजरेकर हे कलाकारही आहेत. अनेक भाषांमध्ये बनत असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण होत आले आहे. हॉलीवूडचा चित्रपट ‘ट्रान्स्फॉर्मर’चे प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर कॅनी बेटस् या चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्ये चित्रीत करणार आहेत. चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे. ‘साहो’ शिवाय श्रद्धाचे ‘छिछोर’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या बायोपिकमध्येही ती काम करणार होती; पण कामाच्या व्यस्ततेमुळे आता तिला हा चित्रपट सोडावा लागला आहे.