‘अलेक्सा’च्या मदतीने उलगडणार खुनाचे रहस्य

Last Updated: Nov 08 2019 8:01PM
Responsive image


वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा पोलिस जुलैमध्ये झालेल्या एका मर्डर मिस्ट्रीला उलडण्यासाठी अमेजन इको आणि इको डॉट (व्हर्च्युअल असिस्टंट) च्या रेकॉर्डिंगची मदत घेणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सर्च वॉरंटही घेतले आहे. अमेजन अलेक्सा या स्पीकरमध्ये खुनाचे महत्त्वाचे पुरावे असू शकतात असे त्यांना वाटते.

फ्लोरिडाच्या 32 वर्षांच्या सिल्विया गाल्वा क्रेस्पो जुलैमध्ये आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या छातीत दुखापत असल्याचे दिसून आले होते. त्यांच्या 43 वर्षांच्या पती अ‍ॅडम क्रेस्पो यालाच एकमेव संशयित ठरवण्यात आले होते. सिल्वियावर झालेल्या हल्ल्याचे पुरावे ऑडियो रेकॉर्डिंग स्मार्ट स्पीकर्समध्ये कॅप्चर झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे स्पीकर्स त्यांच्या मुख्य बेडरूममध्ये होते. हे स्पीकर्स अमेजनच्या सर्व्हरशी जोडले गेलेले आहेत. अर्थात पोलिसांचे हे अनुमान चुकीचेही असू शकते. याचे कारण म्हणजे अमेजन अलेक्सा केवळ कॅचफ—ेज (वारंवार कमांड) नंतरच केलेली बातचीत रेकॉर्ड करते. शिवाय एखाद्या ग्राहकाची खासगी माहिती सरकारी परवानगीशिवाय दिली जात नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.