Sun, Jul 21, 2019 16:59
    ब्रेकिंग    होमपेज › Vishwasanchar › ‘नासा’चा संशोधक म्हणतो, एलियन्स येऊन गेले!

‘नासा’चा संशोधक म्हणतो, एलियन्स येऊन गेले!

Published On: Dec 07 2018 1:50AM | Last Updated: Dec 07 2018 1:50AM
वॉशिंग्टन ः 

‘नासा’चे एक वैज्ञानिक सिल्वानो पी. कोलंबानो यांनी एलियन्स म्हणजेच परग्रहवासी पृथ्वीवर येऊन गेल्याचा दावा केला आहे. हे एलियन्स मानवाच्या तुलनेत अधिक बुद्धीमान असून त्यांच्याकडे जणू काही ‘सुपरब्रेन’ आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. माणूस कल्पनाही करणार नाही इतके त्यांचे तंत्रज्ञान प्रगत असून ते अंतराळ प्रवास अधिक सहजपणे करू शकतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. ‘नासा’च्या इंटेलिजंट सिस्टीम डिव्हिजनमध्ये काम करणार्‍या सिल्वानो यांनी म्हटले आहे की, एलियन्सचे जीवन माणसाच्या पारंपरिक कार्बन आधारित जीवनापेक्षा वेगळे आहे. मानवी संस्कृतीच्या सापेक्ष आपण त्यांच्या संस्कृतीचा विचार करू शकत नाही. माणसाने आपल्या विचारांच्या कक्षा अधिक रूंदावल्या पाहिजेत. कॅलिफोर्नियातील ‘नासा’च्या ‘बाह्य अंतराळाचा शोध’ या विषयावर आधारित ‘डीकोडिंग एलियन इंटेलिजन्स’ नावाच्या कार्यशाळेत त्यांनी याबाबतचे विचार मांडले. ते म्हणाले, संशोधकांनी अन्य ग्रहांपासून मिळणार्‍या संकेतांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केला पाहिजे. असेही होऊ शकते की, पृथ्वीपेक्षा जुन्या असलेल्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असेल व त्याबाबत आपल्याला माहिती नाही. त्यांच्यापासून येणारे सिग्‍नल पकडण्यातही आपण सक्षम नसू.