पुष्कर मेळ्यात 2150  महिलांचा घुमर नृत्याचा विक्रम

Last Updated: Nov 08 2019 8:04PM
Responsive image


जयपूर : राजस्थानमध्ये महिलांचे घुमर नृत्य लोकप्रिय आहे. राज्याबाहेरच्या लोकांना अलीकडे ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटामुळे घुमर नृत्याची माहिती समजलेली आहे. आता ब—ह्मदेवाचे अत्यंत प्राचीन स्थळ व पुष्कर या सरोवरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुष्करमधील मेळ्यात घुमर नृत्याचा विक्रम करण्यात आला. राजस्थानी रंगीबेरंगी पोषाखात सजलेल्या 2150 महिलांनी यावेळी एकत्र येऊन घुमर नृत्य केले. भारतातील सर्वात मोठे घुमर नृत्य म्हणून या विक्रमाची नोंद झाली.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली. या भव्य घुमर नृत्याची तयारी महिनाभर आधी सुरू करण्यात आली होती. यासाठीचे नृत्यदिग्दर्शन स्मिता भार्गव यांनी केले. सहभागी महिलांनी व्हिडीओच्या सहाय्याने घुमर नृत्याचे धडे घेतले आणि एका लयीत 2150 महिलांनी नृत्य करून हा विक्रम घडवला. यापूर्वी 1750 महिलांनी जोधपूरमध्ये घूमर नृत्य केले होते. हा विक्रम पुष्कर मेळ्यात मोडण्यात आला. पुष्कर मेळ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तेथील पशू महोत्सवही जगप्रसिद्ध आहे. हा मेळा पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.