सौदीच्या  विमानतळावर जॅकलिनचा फोटो

Last Updated: Oct 09 2019 10:15PM
Responsive image


मुंबई ः

श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिस सध्या आगामी ‘ड्राईव्ह’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच आता तिच्यासाठी आणखी एक खास घटना घडलेली आहे. किंगडम ऑफ सौदी अरेबियाच्या विमानतळावर तिचा फोटो झळकला असून एखाद्या महिला सेलिबि—टीचा फोटो तिथे झळकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा खास सन्मान मिळवणारी ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. विशेष म्हणजे यामध्ये जॅकलिनने त्या देशात प्रसिद्ध असलेल्या अन्य व्यावसायिक महिला कलाकारांप्रमाणे चेहरा झाकलेला नाही.

सध्या सौदी अरेबियात तेथील युवराजांनी उचललेल्या नव्या पावलांमुळे बर्‍याचशा गोष्टींवरील निर्बंध दूर होत आहेत. विशेषतः महिलांबाबतचे अनेक निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. अशा स्थितीत आता जॅकलिनचाही फोटो तेथील विमानतळावर झळकला आहे. जॅकलिन ‘साहो’मधील एका आयटम साँगमध्ये दिसून आली होती व आता तिचा ‘ड्राईव्ह’ चित्रपट 1 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

यामध्ये तिच्यासमवेत सुशांत सिंह राजपूत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट असून तरुण मनसुखानी याने दिग्दर्शन केले आहे. सलमान खानबरोबरच्या ‘किक’च्या यशाने जॅकलिनच्या करिअरची गाडी अधिकच वेगाने धावत असताना सध्या दिसत आहे. ‘अलादीन’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या जॅकलिनने एके काळी ‘श्रीलंका सुंदरी’ म्हणून तिच्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.