फौजदाराच्या खांद्यावर जाऊन बसले माकड!

Last Updated: Oct 09 2019 10:05PM
Responsive image


लखनौ ः

माकडांच्या मर्कटलीला बर्‍याच वेळा चर्चेत येत असतात. आता उत्तर प्रदेशात एका माकडाने तर भलताच प्रकार केला. हे माकड पोलिस ठाण्यात घुसून फौजदार साहेबांच्या खांद्यावर जाऊन बसले आणि त्यांच्या केसांमध्ये काही ‘खाऊ’ मिळतो का हे पाहू लागले!

पीलीभीतच्या एका ठाण्यात नुकताच हा प्रकार घडला आणि त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. हे माकड पोलिस निरीक्षक साहेबांच्या खांद्यावर आरामात विसावून त्यांच्या डोक्यात ऊ सापडते का हे पाहू लागले. या अधिकार्‍यानेही गांगरून न जाता माकडाला काय हवे ते शांतपणे करू दिले व या काळात ते स्वतःही आपले काम करीत राहिले. सुमारे वीस मिनिटांनी माकडाला या सवारीचा कंटाळा आला आणि नंतर ते खांद्यावरून उतरून निघून गेले. ते गेल्यावर आजुबाजूच्या पोलिसांनी आवंढा गिळला! आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.टायमिंगवरून चर्चा : शरद पवार भेटून बाहेर पडताच अमित शहा मोदींच्या भेटीला!


'त्या' ऐतिहासिक फायनल सामन्यातील वादग्रस्त निर्णयावर अखेर विल्यमसन बोलला! 


नाशिक महापौर निवडणूक; भाजपकडून तीन, सेनेकडून चौघांचे अर्ज दाखल 


ऐश्वर्या रायसाठी खास आहे नोव्हेंबर महिना


घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना जामीन मंजूर


आइस बाथनंतर १ कप यूरिन पिते मॅडोना (Video)


महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर सोनिया गांधींचे उत्तर, म्हणाल्या...


ठाणे : प्रशासनाच्या तत्‍परतेने बाल लग्‍न घटिका रोखली


सत्तेसाठी चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच; शिवसेनेला 'गुड न्यूज'ची प्रतीक्षा


एका कोर्सने बदलले राजकुमार हिरानींचे आयुष्य